वणी नगर परिषदेकडून वराह पकडण्याची मोहीम सुरू

सहा जणांची टीम कार्यरत

विवेक तोटेवार, वणी: वणी शहरात गेल्या अनेक दिवसांपासून वराहांचा हैदोस वाढला होता. करीत वणी नगर परिषदेकडून वराह पकडण्याची मोहीम सोमवार 21 नोव्हेंबर पासून सुरू केली आहे. याकरिता सहा जणांची टीम कार्यरत आहे. वराहाच्या हैदासामुळे कित्येक अपघात झाले. अनेक सामाजिक संघटनाकडून या समस्येबाबत निवेदन देण्यात आले होते. शेवटी नगर परिषदेने वणीतील डुकरांना पकडण्याची मोहीम सुरू केली. आतापर्यंत 21 डुकरांना सुरक्षित जंगलात सोडण्यात आले आहे. अजून ही मोहीम सुरू राहणार आहे. सदर मोहीम ही मुख्याधिकारी यांच्या आदेशानुसार नवीन चवरे, अंकुश मोगरे, रितीक मोरे, हर्षु बिसमोरे, अक्षय चवरे, पन्नू तांबे, अक्षय तांबे राबवित आहे.

हे देखील वाचा: 

ब्रेकिंग न्युज – ब्राह्मणी गावालगत आज पहाटे वाघाचा धुमाकूळ

विविध सामाजिक उपक्रम राबवून अजिंक्य शेंडे यांचा वाढदिवस साजरा

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.