शेकडो वरपोडवासीयांची मुकुटबन पोलीस ठाण्यात धडक

वाघिणीच्या हत्येप्रकरणी विनाकारण गोवल्याचा व मारहाण केल्याचा आरोप

0

सुशील ओझा, झरी: मांगुर्ला येथील गर्भवती वाघिणीच्या हत्येप्रकरणी शनिवारी 19 जून रोजी पहाटे 5 वाजताच्या सुमारास पोलीस व वनविभागाचे संयुक्त पथकाने वरपोड येथून 5 आरोपींना अटक केली होती. या प्रकरणाशी कोणताही संबंध नसताना निरपराध व्यक्तींना विनाकारण गोवल्याचा, तसेच अटक करतेवेळी कर्मचा-यांनी गावक-यांना मारहाण केल्याचा आरोप करत शेकडो वरपोडवासीयांनी मुकुटबन पोलीस स्टेशनवर धडक दिली. या प्रकरणाची सखोल चौकशी करून मारहाण करणा-या अधिकारी व कर्मचा-यांवर ऍट्रोसिटी दाखल करावी अशी मागणी करण्यात आली. 

मांगुर्ला परिसरातील गर्भवती वाघिणीच्या हत्येप्रकरणी व सोनेगाव जवळील वाघिणीच्या हत्ये प्रकरणी संयुक्त पथकाने शनिवारी 19 जून रोजी पहाटेच्या सुमारास वरपोड व येसापूर येथे कोम्बिंग ऑपरेशन केले होते. पहाटे 5 वाजताच्या सुमारास संयुक्त पथक वरपोड येथे दाखल झाले होते. त्यांनी वरपोड येथून 5 आरोपींना अटक केली. अटक करतेवेळी वनविभागाच्या कर्मचा-यांनी गावातील इतर लोकांनाही मारहाण केली तसेच अश्लिल शिविगाळ केली, असा आरोप गावक-यांकडून करण्यात आला आहे. या मारहाणीत 7-8 महिलांना दुखापत झाली असून त्यांना उपचारासाठी झरी येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करावे लागल्याचेही त्यांचे म्हणणे आहे.

मांगुर्ला व सोनेगाव येथील वाघाच्या हत्येप्रकरणी गावक-यांचा कोणताही संबंध नसून त्यांना विनाकारण गोवण्यात येत असल्याचा गावक-यांचा आरोप आहे. तसेच बेबंदशाही करत निरपराध लोकांना मारहाण करण्यात आल्याचाही त्यांचा आरोप आहे. वनविभागाच्या अशा कृत्यामुळे आदिवासी समाजावर अन्याय झाला असून मानवी हक्काचे हनन झाले असून बेजबाबदार अधिकारी व कर्मचा-यांवर ऍट्रोसिटी लावावी अशी मागणी यावेळी वरपोडवासियांनी केली. या प्रकरणी त्यांनी लेखी तक्रार दाखल केली असून मारहाण करणा-या कर्मचा-यांवर गुन्हे दाखल न केल्यास आमरण उपोषण केले जाईल असा इशाराही दिला.

यावेळी पैकु टेकाम, महादेव टेकाम, सुनील टेकाम, आनंद टेकाम, राजेश्वर टेकाम, सुंदर टेकाम, किसन टेकाम, विनिद,एकं, जंगा मडावी, सुरेश आत्राम, लक्ष्मण कोडापे, यंक्यु दडंजे, सीमा टेकाम, भोनू टेकाम, लखमा टेकाम, प्रेमीला टेकाम, मादीबाई टेकाम, लक्ष्मी टेकाम, अनुसया आत्राम, लिलाबाई आत्राम सह शेकडो वरपोडवासी उपस्थित होते.

हे देखील वाचलंत का?

पोस्ट ऑफिसच्या गेस्टरूममध्ये कर्मचा-याची आत्महत्या

सर्वात कमी किमतीत शेतीच्या कुंपणासाठी झटका मशिन उपलब्ध

वणीतील रविनगर येथील घर (ड्युप्लेक्स) विकणे आहे

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.