आता तालुक्यात अवघे 7 ऍक्टिव्ह रुग्ण, आज 1 पॉझिटिव्ह

0
37

जब्बार चीनी, वणी: तालुक्यात कोरोनाची लाट ओसरली असून आता केवळ 7 ऍक्टिव्ह रुग्ण बाकी आहेत. मात्र अद्याप धोका टळला नसल्याचा इशारा आरोग्य विभागाने दिला असून लोकांनी कोरोनासंदर्भातील नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. आज सोमवारी दिनांक 22 जून रोजी तालुक्यात कोरोनाचा 1 रुग्ण आढळला आहे. हा रुग्ण भीमनगर येथील आहे. आज एका कोरोनामुक्त रुग्णाला सुटी देण्यात आली.

आज यवतमाळहून 46 रिपोर्ट प्राप्त झाले. यात 1 पॉझिटिव्ह आला आहे. तर आज 41 संशयीतांची रॅपिड ऍन्टिजन टेस्ट घेण्यात आली. यात सर्व व्यक्ती निगेटिव्ह आलेत. आज आलेल्या रुग्णांवरून यवतमाळ येथे 24 संशयीतांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले. अद्याप यवतमाळहून 31 संशयीतांचे रिपोर्ट येणे बाकी आहे.

सध्या तालुक्यात कोरोनाचे 7 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. यातील 2 रुग्ण कोविड केअर सेंटरला उपचार घेत आहेत. तर 2 रुग्ण होम आयसोलेट आहेत. 3 रुग्णांवर यवतमाळ व इतर ठिकाणी उपचार सुरू आहे.

तालुक्यात कोरोनाचे एकूण 5261 रुग्ण आढळून आलेत. यातील 5161 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर आतापर्यंत 93 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. (यात बाहेरगावी उपचार सुरू असताना मृत झालेल्या रुग्णांचा समावेश नाही.)

हे देखील वाचलंत का?:

अत्यंत प्रतिकुल प्ररिस्थितीवर मात करीत मारेगावचे प्रतीक खैरे डॉक्टरेट

पोस्ट ऑफिसच्या गेस्टरूममध्ये कर्मचा-याची आत्महत्या

आता अवघ्या 1.5 हजारात कुंपन झटका मशिन

आझाद इलेक्ट्रॉनिक्समध्ये होलसेल दरात खरेदी करा फवारणी पम्प

Previous articleशेकडो वरपोडवासीयांची मुकुटबन पोलीस ठाण्यात धडक
Next articleअत्यंत प्रतिकुल प्ररिस्थितीवर मात करीत मारेगावचे प्रतीक खैरे डॉक्टरेट
निकेश जिलठे - संपादक वणी बहुगुणी 2007 पासूून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. ग्रामीण व शहरी असा पत्रकारितेचा अनुभव. आजतक, झी, जय महाराष्ट्र, टीव्ही 9 इत्यादी आघाडीच्या टीव्ही मीडियात मुंबई येथे विविध पदावर 10 वर्ष कार्यरत. सध्या एका पीआर एजन्सीचे संचालक तसेच वणी बहुगुणी या वेबसाईटचे मुख्य संपादक. यवतमाळ जिल्ह्यातील पहिले न्यूज पोर्टल वणी बहुगुणी या स्थानिक न्यूज पोर्टलच्या माध्यमातून परिसरातील ज्येष्ठ व नव्या दमाच्या पत्रकारांसह वणी व परिसरातील बातम्या व ताज्या घडामोडी पोहोचवण्याचा एक प्रयत्न. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक विषयावर विविध माध्यमात लिखाण. राज्यातील अनेक ज्येष्ठ नेते व मंत्री यांचे मीडिया कन्सलटन्ट म्हणूनही कार्य.
Loading...