विवेक तोटेवार, वणी: वणी पोलीस ठाण्याचे बिट जमादार विठ्ठल बुर्रेवार यांच्यासोबत रविवार सकाळी 11 वाजताच्या सुमारास पांढरकवड्यातील अन्नपूर्णा रेस्टॉरंटजवळ वाद झाला. या वादाचे रूपांतर भांडणात झाले. या भांडणात विठ्ठल बुर्रेवार यांच्या गंभीर इजा झाली. त्यांना उपचारासाठी यवतमाळ येथे हलविण्यात आल्याची माहिती आहे.
वणीच्या पोलीस ठाण्यात दीपक चौपटी बिटचे बिट जमादार विठ्ठल बुर्रेवार हे पांढरकवडा येथे त्यांच्या नातेवाईकांकडे गेले होते. त्यांनी काही दिवसांपूर्वी किन्ही, नंदपूर येथील शेतशिवारत संशयितरीत्या फिरत असलेल्या जाकीर सैय्यद रा. किन्ही, नंदपूर याला गावकऱ्यांच्या मदतीने अटक केली होती.
याचा वचपा काढण्याकरिता जाकीर याने आपल्या दोन मित्रांच्या मदतीने रविवार दुपारी 11 वाजताच्या सुमारास बसस्थानक परिसरातील अन्नपूर्णा हॉटेलजवळ विठ्ठल बुर्रेवार व त्यांचे नातेवाईक अशोक सामृतवार यांच्यावर लोखंडी रॉडणे हल्ला केला.
या हल्ल्यात या दोघांच्याही हात, पाय व कंबरेला गंभीर दुखापत झाली. याबाबतची तक्रार विठ्ठल बुर्रेवार यांचा भाचा सुभाष सामृतवार याने दिली आहे. त्याच्या तक्रारीवरून पांढरकवडा पोलीस ठाण्यात आरोपी जाकीर सैय्यद व त्याचे दोन साथीदार यांच्याविरुद्ध कलम 326, 34 भादंविनुसार गुन्हा नोंद केला आहे. घटनेचा पुढील तपास पांढरकवडा पोलीस करीत आहे.
हेदेखील वाचा
हेदेखील वाचा
[…] वणीच्या बिट जमादारावर पांढरकवडा येथे… […]