पुरुषोत्तम नवघरे, वणी: वणी पब्लिक स्कूल येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती ‘बालिका दिन’ म्हणून उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त गीत, नृत्य व फॅन्सी ड्रेस इत्यादी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पूर्व माध्यमिक शाळेच्या चिमुकल्यांनी सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांची केलेली वेशभूषा आजचे विशेष आकर्षण ठरले. कार्यक्रमाला शाळेच्या मुख्याध्यापिका ज्योती राजूरकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला हारार्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर विविध स्पर्धा घेण्यात आल्या. फॅन्सी ड्रेस स्पर्धेत विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रात आघाडीवर असलेल्या स्त्रीयांची वेशभूषा केली तसेच स्त्री पुरुष समानता यावर प्रबोधन केले. यावेळी निबंध स्पर्धेचे बक्षिसही जाहीर करण्यात आले. कल्याणी ठाकरे हिला पहिले, सौम्या पुरवार दुसरे तर तिसरे पारितोषिक रिद्धी राऊत हिला मिळाले.
मान्यवरांच्या उपस्थितीत विविध स्पर्धेत प्राविण्य मिळवणा-या व सहभाग घेणा-या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन ज्युनियर कॉलेजची विद्यार्थीनी काजल कोचर हिने केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
हे देखील वाचा:
Comments are closed.