वणीतील विद्यार्थ्यांचे कुंग फु व कराटे स्पर्धेमध्ये यश

चिमूर येथे पार पडलेल्या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये पटकाविले पदक

जितेंद्र कोठारी, वणी: कुंग फु कराटे असोसीएशन व शुश आसरा फाऊंडेशन इंडियाच्या वतीने आयोजित राष्ट्रीय कुंग फु कराटे स्पर्धेत वणीतील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून पदके पटकाविण्याचा मान मिळविला आहे. चिमूर येथे 4 डिसेंबर 2022 रोजी आयोजित या स्पर्धेमध्ये ओकिनावा शोरीन न्यू शोरीनकान या क्लासच्या २० खेळाडूंनी सहभाग घेतला.

या स्पर्धेमध्ये सानिका कांबळे, तनीश कामळे, स्पर्श त्रिंबके, सृष्टी लुथडे, गायत्री लुथडे, दिशा तुरानकर, नकुल राखुंडे, पियुष राखुंडे, युक्ता खंगार, तेजस बुरडकर, इश्वरी राऊत, अक्षत राऊत, तन्मय पिदुरकर, आहाना शेख, तपस्वी नागपूरे, सर्वदा मुरस्कर, प्रांजली ठक, सार्थक नागपूरे, श्री जुनगरी, आदर्श चिकाटे या चिमुकल्या खेळाडूंनी पदके मिळवीली.

यशस्वी खेळाडूंनी आपल्या यशाचे श्रेय आपल्या आई-वडील व हंसी शरद सुखदेवे, सिहान शरद चिकाटे, मुख्य मार्गदर्शक सेनसाई धनंजय त्रिंबके, मुख्य प्रशिक्षक सेनसाई नरेश मुरस्कर, महीला सेनसाई शारदा ठक व मेघा रंगारी यांना दिले आहे. पदके पटकाविणाऱ्या खेळाडूंचे सर्व स्तरावरून कौतूक केले जात आहे.

हे देखील वाचा:

वाघाची पाणी पिण्यासाठी थेट बेड्याजवळील शेतात एन्ट्री

चोरट्यांचा आता शेतमालावर डल्ला… 8 क्विंटल कापूस चोरी

आणखी अल्पवयीन शालेय विद्यार्थिनी बेपत्ता

Comments are closed.