विधवा महिलेची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

हिवरा (मजरा) येथील घटना

0

नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्यात आत्महत्येचे सत्र काही केल्या थांबेना. आज शुक्रवार दिनांक 4 सप्टेंबर रोजी एका विधवा महिलेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली, ही घटना मार्डी नजीक हिवरा (मजरा) येथे घडली. संगीता नामदेव खापणे (35) असे आत्महत्या करणाऱ्या महिलेचे नाव आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

प्राप्त माहिती नुसार मृतक महिलेच्या पतीचे गेल्या 8 वर्षी पूर्वी निधन झाले होते. ती तेव्हापासून माहेरी हिवरा येथे राहत होती. मृतक संगीताने दुपारी 12.30 वाजताच्या दरम्यान गावातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली.

मृतक संगीताच्या पश्चात एक मुलगा एक मुलगी व आप्तपरिवार आहे. वृत्त लिहिपर्यंत आत्महत्येचे कारण कळू शकले नाही

Leave A Reply

Your email address will not be published.