वेकोलि पदोन्नती प्रकरण: अधिका-याचे रंगेल चाळेही प्रसिद्ध
कर्मचा-यावर वरदहस्त असणा-या अधिका-याची चौकशी होणार का?
जब्बार चीनी. वणी: वेकोलि वणी नार्थ मधील एका कर्मचा-यावर आरोपपत्र (चार्जशिट) असताना त्याला पदोन्नती देण्याचा प्रताप एका अधिका-याने केला. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी आता जोर धरत असतानाच या अधिका-याच्या इतर भोंगळ्या कारभाराचीही चांगलीच खमंग चर्चा सध्या वेकोलि क्षेत्रात रंगत आहे. कार्यालयीन कामापेक्षा इतर कामात अधिक लक्ष असल्याने या अधिका-याकडून प्रशासकीय कामात चांगलाच घोळ घातला गेला आहे.
अत्यल्प मोबदल्यात उत्कृष्ट सेवेमुळे हा अधिकारी चांगलाच लोकप्रिय आहे. या शौकिन अधिका-याचे कार्यालयीन वेळेतच स्मॉल स्मॉल सुरु होते. अधिका-याची ही कमजोरी अनेकांना माहिती आहे. त्यामुळे एक बाटली देणा-याचे काम आधी, हे धोरण इथे सुरू आहे. स्वस्तात मस्त सेवेचा लाभ मिळत असल्याने कामगार संघटनाच्या नेत्यांचेही चांगलेच फावत आहे. मात्र यात अऩेक कामगारांचे नुकसान होत आहे. नवीन अपॉइंटमेंट आली तर सर्विस फाईलही त्यासोबतच येते. कुणी अनुकंपावर नियक्त असतो. कुणाची बदली होते. कुणाचे प्रमोशन असते. यागोष्टी सर्विस फाईलवर अवलंबून असते. मात्र या भोंगळ कारभारात अनेकांच्या सर्विस फाईल या अधिका-याकडून गहाळ झाल्या असल्याची चर्चा वेकोलि क्षेत्रात आहे.
दारूचा चांगलाच शौकिन असलेल्या या अधिका-याला दारूनंतर चखण्यात ‘हाफ फ्राय’ हवे असते. 90 झाले की त्याचे पाय आपसुकच ‘हाफ फ्राय’ खाण्यासाठी वळतात. म्हातारपणी लोक ‘काम’ कमी करून तब्येतीची काळजी घेतात. गोडधोड कमी खातात. मात्र हा अधिकारी ‘गोडधोड’ खाण्याचा चांगलाच शौकीन आहे. सणावाराला केले जाणारे गोड धोड ‘बोंडं’ही मन मानेल तेव्हा खाण्याची सवय या अधिका-याला लागली आहे. यासाठी शक्य तेवढ्या सु’निती’चा वापर हा अधिकारी करतोय.
काय आहे वेकोलितील पदोन्नती प्रकरण?
वणी रेल्वे सायडिंगवर लोडींग इंचार्ज पदावर कार्यरत असणा-या सुधाकर ढाले यांना वेकोलिच्या भंगार चोरी प्रकरणात चार्जशीट दिली गेली होती. यानंतर वणी नॉर्थमध्ये पिंपळगाव व जुनाड उपक्षेत्रीय प्रबंधकांनी देखील त्यांना कर्तव्यावर गैरहजर राहल्याबाबत दोन चार्जशीट दिल्या होत्या. ढाले हे तेव्हा सहाय्यक लोडींग सुपरीडेन्ट होते. परंतु तीन चार्जशीट असताना त्यांना प्रबंधनाने पदोन्नती देऊन लोडींग सुपरीडेन्ट करण्यात आले आहे. याशिवाय एका ट्रान्सपोर्टर कडून लाच मागितल्याचा त्यांचा विडियोही व्हायरल झाला होता. त्यानंतर त्यांची बदली करण्यात आली होती. काळवंडलेला रेकॉर्ड असतानाही ढाले यांना कोणते प्रमाण लावून पदोन्नती देण्यात आली हा प्रश्न सध्या विचारला जात आहे.
ढाले यांना रंगेल अधिका-याचा वरदहस्त आहे. त्यांच्यामुळेच त्यांना पदोन्नीत मिळाल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे या प्रकरणात हा रंगेल अधिकारीही चर्चेत आला आहे. या अधिका-याच्या पाच वर्षांच्या कार्याची सखोल चौकशी झाली तर अऩेक घबाड बाहेर येऊ शकते. यात पदोन्नती, बदली करणे, बदली थांबवणे. स्टे देणे, इत्यादीत झालेले गैरप्रकार आहे.
गैरप्रकारासह अधिका-याचे रंगेल चाळेही चांगलेच प्रसिद्ध असताना वेकोलिचे वरिष्ठ अधिकारी याकडे दुर्लक्ष का करीत आहे किंवा या अधिका-याची पाठराखण का करीत आहे हे एक न उलगडलेले कोडे आहे. एकूणच या प्रकरणामुळे वेकोलिची प्रतिमा चांगलीच मलिन होत आहे. पदोन्नती प्रकरणासह या अधिका-याच्या गेल्या पाच वर्षांतील प्रकरणाचीही इतर सखोल चौकशी करावी अशी मागणी आता जोर धरीत आहे.
हे पण वाचा…
हे पण वाचा…