रागाच्या भरात महिला निघाली घरून निघून

तीन दिवसांपासून बेपत्ता, आढळल्यास संपर्क साधण्याचे आवाहन

0

जब्बार चीनी, वणीः वणी बसस्टॅण्डमागील गायकवाड फैल येथून 30 डिसेंबरला रागाने एक महिला घरून निघून गेली. मीरा विठ्ठल गायकवाड (39) असे या महिलेचे नाव आहे. या महिलेची उंची 4 फूट असून रंग सावळा आहे. निघताना पिवळ्या रंगाचा सलवार टाॅप आणि हिरव्या रंगाचे स्वेटर घातले होते.पायात स्लिपर आणि सोबत साधा मोबाईल (7264922030)होता.

दिनांक 30 डिसेंबरच्या सायंकाळी ती रागाने घराबाहेर गेली. त्यानंतर रात्री परत आलीच नाही. तिची शहरात, आजूबाजूला आणि नातेवाईकांकडे विचारपूस केली. तरीही तिचा पत्ता लागला नाही. मीराचा भाऊ दिगंबर उर्फ वसंतराव यांनी वणी पोलिस स्टेशनला बहीण हरविल्याची माहिती दिली. वरील वर्णनाची महिला कुणाला आढळल्यास 9823793159, 9588407161, 9881752961 या नंबरवर संपर्क करण्याची विनंती केली आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

हेदेखील वाचा

हेदेखील वाचा

Leave A Reply

Your email address will not be published.