इलेक्ट्रिक पोलवरून कोसळून कामगाराचा मृत्यू

वणीतील प्रगती नगर येथील घटना, कर्मचा-याच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर.... कंपनीने आर्थिक मदत करण्याची मागणी

पुरुषोत्तम नवघरे, वणी: शहरातील प्रगतीनगर येथे विद्युत पोलचे काम करीत असताना एक कंत्राटी कर्मचारी बुधवारी पोलवरून खाली कोसळला होता. त्या कर्मचा-याचा आज सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. सचिन बापूराव बुरडकर (वय 45) असे मृत कंत्राटी कर्मचा-याचे नाव आहे. सचिन हा घरचा एकमेव कर्ता पुरुष होता. सचिनचा अचानक मृत्यू झाल्याने त्याच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान सचिनच्या कुटुंबीयांनी कंपनीकडे आर्थिक मदतीची मागणी केली आहे.

मृतक सचिन बापूराव बुरडकर हा जैन स्थानक समोरील सुतार पुरा येथील रहिवाशी होता. नगरपरिषद अंतर्गत शहरातील विद्युत पोलवर एलईडी बल्ब लावण्याचे व दुरुस्तीचे काम पुणे येथील EESL या कंपनीला मिळालेले आहे. सचिन गेल्या अनेक वर्षांपासून या कंपनीत कंत्राटी कामगार म्हणून मेन्टनन्सचे काम करीत होता. बुधवारी दिनांक 1 जून रोजी सकाळी तो कामासाठी घरून निघाला होता. शहरातील विविध भागातील काम करून तो प्रगती नगर येथे कामासाठी पोहोचला होता.

दुपारी दोन वाजताच्या सुमारास काम करीत असताना अचानक सचिन पोलवरून खाली कोसळला. या दुर्घटनेत त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. सचिन सोबत असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी त्याला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्याला चंद्रपूर येथे रेफर करण्यात आले. चंद्रपूर येथे त्याच्यावर कालपासून उपचार सुरू होता. मात्र आज गुरुवारी सकाळी 8 वाजताच्या सुमारास त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

कुटुबीयांची आर्थिक मदतीची मागणी
सचिन हा घऱचा एकमेव कर्ता पुरुष होता. सचिनच्या मागे पत्नी, दोन मुले असा आप्त परिवार आहे. सचिनच्या अचानक अपघाती मृत्यूमुळे त्याच्या कुटुंबावर दुहेरी संकट आले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून तो कंपनीत काम करीत होता. त्यामुळे कंपनीने आर्थिक भरपाई द्यावी अशी मागणी सचिनच्या कुटुंबीयांनी केली आहे. यासाठी विविध संघटनेने पुढाकार घ्यावा अशी अपेक्षाही सचिनच्या कुटुंबीयांनी व्यक्त केली आहे.

हे देखील वाचा:

चक्क हैदराबादहुन तो ‘मटका’ लावायला आला वणीत !

 

उद्या वणीतील कल्याण मंडपम येथे महारक्तदान शिबिराचे आयोजन

 

देशातील प्रख्यात पोदार इंटरनॅशनल स्कूलचा उपक्रम आता वणीत

पालकांचा कल आता जगप्रसिद्ध सिंगापूर पॅटर्नकडे

चला डायनासोर्सच्या थरारक दुनियेत… जुरासिक वर्ल्ड सुजाता थिएटरमध्ये रिलिज

 

 

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.