वसंतनगर येथे उंदीर मारण्याचे औषण पिऊन युवा शेतक-याची आत्महत्या

मारेगाव तालुक्यात दर आठवड्यात आत्महत्या, लोकप्रतिनिधी निद्रावस्थेत

0

भास्कर राऊत, मारेगाव: तालुक्यामध्ये सततच्या आत्महत्या होत असताना या आत्महत्येचे सत्र मात्र थांबण्याऐवजी वाढतच असल्याचे दिसून येत आहे. तालुक्यातील वसंतनगर येथील एका युवा शेतकऱ्याने गेल्या आठवड्यात उंदर मारण्याचे औषध घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्या शेतक-याचा मंगळवारी नागपूर येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृतकाचे नाव महेश दयालाल राठोड (26) असे आहे.

मारेगाव तालुक्यातील वसंतनगर येथील महेश दयालाल राठोड (26) या युवा शेतक-याने 27 जुलै रोजी दुपारी दोन वाजताच्या सुमारास स्वतःच्या राहत्या घरी उंदीर मारण्याचे औषध प्राशन केले होते. याची कुटुंबातील सदस्यांना माहिती मिळताच महेशला लगेच उमरी येथील रूग्णालयात दाखल केले. तेथे प्राथमिक उपचार करून डॉक्टरच्या सल्ल्यानुसार पुढील उपचारासाठी नागपूर येथे दाखल करण्यात आले होते.

नागपूर येथे उपचार सुरू असताना मंगळवार दि. 3 ऑगस्टला रात्री 11 वाजताच्या दरम्यान महेशचा मुत्यू झाला. महेश यांची वागदरा शिवारात गट नं. 89/1 येथे 1 हेक्टर 83 आर एवढी शेती आहे. महेश याच्या आत्महत्याचे नेमके कारण सध्या तरी कळू शकले नाही. महेश यांच्या पश्चात आई, वडील पत्नी व बराच मोठा आप्त परिवार आहे.

हे देखील वाचा:

विवाहित महिलेचा भर रस्त्यात विनयभंग

अखेर भूमी अभिलेखच्या ‘त्या’ वादग्रस्त कर्मचा-यासह तिघांवर गुन्हा दाखल

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.