इलेक्ट्रिकच्या वायरने तरुणाने घेतला गळफास

वडिलानंतर मुलाचीही आत्महत्या, मारेगावात खळबळ

0

नागेश रायपुरे, मारेगाव: एका अविवाहित तरुणाने स्वतःच्या घरी गळफास लावुन आत्महत्या केल्याची घटना मारेगाव शहरातील प्रभाग क्र 4 मध्ये घडली. आज रात्री 9 वाजताच्या दरम्यान ही घटना उघडकीस आली. प्रवीण पुरुषोत्तम परसुटकर (30) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. काही वर्षांपूर्वी मृतकाच्या वडिलांनीही आत्महत्या केली होती. आता मुलानेही हे पाऊल उचचल्याने शहरात खळबळ उडाली आहे. 

Podar School 2025

प्राप्त माहिती मृतक प्रविण पुरुषोत्तम परसुटकर हा पूर्वी ग्रामीण रुग्णालयात टेम्पररी काम करत होता. 3-4 महिन्या पूर्वी त्याचे रुग्णालयातील काम बंद झाले. दरम्यान कोविड 19 च्या ब्रेक द चेन अंतर्गत लॉकडाऊनमुळे काम नसल्याने तो गेल्या अनेक दिवसां पासून आर्थिक विवेचनात होता. त्यामुळे तो मानसिक तणावात असल्याची माहिती आहे. 

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

दरम्यान रात्री 9 वाजता दरम्यान प्रवीणच्या आईने त्याच्या रूममध्ये जाऊन जेवणासाठी बोलवले असता आतून प्रवीणने कोणताही प्रतिसाद दिला नाही. दरम्यान त्यांना प्रवीणने घराच्या आड्याला इलेक्ट्रिकच्या वायरने गळफास घेतल्याचे आढळून आले.

प्रवीण च्या आत्महत्येचे नेमके कारण कळु शकले नाही. त्याचे मागे विधवा आई, विवाहित बहिण व आप्त परिवार आहे.

प्रवीणच्या वडिलांनीही केली होती आत्महत्या
5-6 वर्षांपूर्वी मृतकाचे वडील पुरुषोत्तम परसूटकर यांनी सुद्धा गळफास लावून आत्महत्या केली होती. आता वडीला पाठोपाठ मुलाने सुद्धा गळफास लावून आत्महत्या केली आहे. त्यामुळे शहरात हळहळ व्यक्त होत आहे.

हे देखील वाचा:

Leave A Reply

Your email address will not be published.