बापादेखत मुलाने घेतली पुलावरून उडी!

कारण अस्पष्ट, शनिवारच्या दुपारची घटना

0

विवेक तोटेवार, वणी: शनिवार 26 सप्टेंबर रोजी दुपारी 4 वाजताच्या सुमारास एका युवकाने वडलांसमोरच पाटाळा पुलावरून उडी घेतल्याची माहिती आहे. सदर युवक हा अभियांत्रिकी तिसऱ्या वर्षाला शिक्षण घेत होता. त्याने असे टोकाचे पाऊल का उचलले याचे कारण समजू शकले नाही. अनिकेत अरुण वैद्य (22) रा. कुचना पॉ. स्टे. माजरी हा अभियांत्रिकी च्या तिसऱ्या वर्षाला शिक्षण घेत होता. लॉकडाऊनमुळे सध्या आपल्या घरी येऊन होता.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

तो घरी नसल्याने त्याचे वडील व भाऊ त्याचा शोध घेत होते. शनिवार 26 सप्टेंबर रोजी दुपारी 4 वाजताच्या सुमारास तो पाटाळा पुलाजवळ दिसून आला. त्याने जसे आपल्या वडील व भावाला बघितले तोच धावत जाऊन त्याने पुलावरून नदीत उडी घेतली. घटनेची माहिती वणी पोलिसांना मिळताच वणीतून पो.हे. कॉ. डोमाजी भदिकर यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. शोध घेतला; परंतु अनिकेतचा कुठेही थांगपत्ता लागला नाही.

(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)

Leave A Reply

Your email address will not be published.