21 वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

शिवणी येथील घटना, या कारणासाठी उचलले पाऊल....

विवेक तोटेवार, वणी: एका 21 वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत शिवणी (जहांगिर) येथे ही घटना घडली. गुंजन अशोक राजूरकर असे मृत तरुणाचे नाव आहे. शनिवारी संध्याकाळच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.

गुंजन अशोक राजूरकर (21) हा शिवणी येथील रहिवासी होता. तो घरी त्याचा भाऊ व आईसह राहायचा. गुंजन वेकोलि अधिका-याच्या गाडीवर खासगी चालक म्हणून काम करीत होता. भाऊ देखील वेकोलित खासगी काम करतो. तर गुंजनची आई पिठगिरणी (चक्की) सांभाळते. ही चक्की घरापासून काही अंतरावर आहे. शनिवारी गुंजनचा मोठा भाऊ साखरा येथे ड्युटीवर गेला होता. तर आई चक्कीवर गेली होती. दरम्यान गुंजन घरी एकटाच होता.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

घरी कुणी नसल्याची संधी साधून त्याने छताला दोरीने गळफास घेतला. सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास गुंजनची आई घरी आली. तेव्हा तिला गुंजन गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला. हे चित्र दिसताच तिने हंबरडा फोडला व आरडा ओरड केला. त्यामुळे घराशेजारील लोक आले. याची माहिती गावाचे पोलीस पाटल ज्ञानेश्वर लांडगे यांना दिली. त्याचा मृतदेह उतरवला गेला.

स्थानिक डॉक्टरांनी तपासणी करून त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले. उपस्थितांनी तातडीने याची माहिती शिरपूर पोलीस स्टेशनला दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला व मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी वणी येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवला. आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकले नाही. एका तरुण मुलाने हे पाऊल उचलल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे.

Comments are closed.