झरी नगरपंचायतीच्या १७ प्रभागांतील आरक्षण जाहीर
सर्वाधिक महिला आरक्षणाने इछुकांच्या मनसुब्यांवर फेरले पाणी
सुशील ओझा,झरी: नगरपंचायतीच्या १७ प्रभागाचे आरक्षण १० नोव्हेंबर रोज तहसील कार्यालयात जाहीर करण्यात आले आहे. आरक्षणात महिलांचे आरक्षण जास्त प्रमाणात निघाल्याने इतर वर्गातील इच्छुकांच्या मनसुब्यांवर पाणी फेरल्याचं चित्र पहायला मिळत आहे.
त्यामुळे “कही खुशी कही गम” सारखे चित्र पहायला मिळत आहे. झरी नगरपंचायत मध्ये १७ वॉर्ड मिळून १७ नगरसेवक व दोन स्वीकृत सदस्य आहे. १७ वॉर्डातील आरक्षण जाहीर लोकसंख्येनुसार जाहीर करण्यात आले. प्रभाग १,२,३,६, १३ व१६ करीता अनुसूचित जमाती महिला आरक्षित करण्यात असले तर प्रभाग ५ व १५ नागरिकांचा मागास प्रवर्गातील महिला राखीव प्रभाग १७ अनुसूचित जाती मधील महिला करीता तसेच प्रभाग ४,७,११ हे राखीव झाले आहे.
नगरपंचायतीच्या १७ सदस्यांमध्ये ९ महिला सदस्य आहे. आरक्षणाची सोडत काढताना उपजिल्हाधिकारी (रोहयो) संगीता राठोड, तहसीलदार गिरीश जोशी, नायब तहसीलदार रामचंद्र खिरेकर यांसह कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.
हेदेखील वाचा
आकाशकंदिलाचा संदर्भ रामायणात, मेसोपोटोमियात आणि बऱ्याच ठिकाणी
हेदेखील वाचा
[…] झरी नगरपंचायतीच्या १७ प्रभागांतील आर… […]