पंचायत समितीमधील रिकाम्या पदांमुळे नागरिकांची ससेहोलपट

0

सुशील ओझा, झरी: येथील पंचायत समितीत ४० पैकी तब्बल २४ पदे रिक्त असल्याने नागरिकांची ससेहोलपट होत आहे. छोट्या मोठ्या प्रशासकीय कामांसाठीदेखील प्रचंड दिरंगाई होत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून अधिकारी व कर्मचारी यांची ही पदे रिक्त आहेत. त्यामुळे नागरिकांच्या कामांचा खोळंबा होत आहे.

पंचायत समितीतील विविध विभागांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असल्याने त्या संबंधित विभागातील कार्यालयीन कामासाठी आलेल्या नागरिकांना परत जावे लागत आहे. यामुळे पंचायत समितीत कार्यालयीन कामाकरिता आलेल्या नागरिकांत संताप व्यक्त होत आहेत. अपुऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संख्येमुळे विविध विभागांतील कार्यालयात नागरिकांच्या कामाची कागदपत्रे धूळ खात पडली आहे. नागरिकांची कार्यालयीन कामांसाठी पायपीट वाढली आहे.

पंचायत समितीतील नागरिकांच्या कार्यालयीन कामासाठी असलेल्या विविध विभागांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांची कनिष्ठ साहाय्यक ९ पैकी ६ भरलेली असून ३ पदे रिक्त आहे, तर कनिष्ठ साहाय्यक लेखा, १ रिक्त, विस्तार अधिकारी कृषी १, स्था. अभि साहाय्यक, विस्तार अधिकारी पंचा २, विस्तार अधिकारी आरोग्य २, विस्तार अधिकारी शिक्षण २, केंद्रप्रमुख ८, आरोग्यसेवक ० आणि परिचर ४ अशी २४ पदे रिक्त आहे. ४० पदांपैकी केवळ १५ भरलेली असून मागील अनेक वर्षांपासून साधारणत: २४ पदे रिक्त आहे.

पंचायत समितीमधील विविध विभागांत कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त ताण येत आहे. पंचायत समितीमध्ये ग्रामपंचायतच्या अनेक तक्रारी असून अनेकांच्या चौकशा सुरू आहे. तर त्या प्रकरणाचे अहवाल मिटिंगमुळे अडकून पडले आहे. शिक्षण, आरोग्य, विभागाचे पद रिक्त असल्याने शिक्षणाविषयी व आरोग्य कडे दुर्लक्ष होत आहे. विशेष म्हणजे धडक सिंचन व सिमेंटरोडच्या कामाचे बिल काढणारे विभाग बरोबर आहे. या विभागात कोणतेही रिक्त पद नाही. पंचायत समितीमध्ये एवढे पदे रिक्त असताना वरिष्ठ अधिकारी व लोकप्रतिनिधी हे काय करीत आहे, असा प्रश्न संतप्त नागरिकांकडून केला जात आहे..

Leave A Reply

Your email address will not be published.