विवेक तोटेवार, वि.मा. ताजने, वणी: लगतच्या चिखलगाव येथे लाकडी दांड्याने केलेल्या हल्ल्यात एका तरुणाचा मृत्यू झाला. सदर घटना गुरुवारी रात्री दरम्यान घडली. श्रीकांत अरविंद ठाकरे वय ३६ रा. चिखलगाव (मेघदूत वसाहत)असे मृतकाचे नाव आहे. सदर मृत्यू प्रकरणी मृतकाचा नातेवाईक हितेश सुधाकर राऊत याने पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी संशयित आरोपी ज्ञानदीप उर्फ सोनू निमसटकर वय २९, संदेश तिखट वय २२ आणि स्वप्नील धुर्वे ३२ सर्व रा. चिखलगाव (बोधेनगर) यांना अटक केली. त्यांच्या विरुद्ध भांदवी कलम ३०२, २०१, ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
मृतक आणि संशयित आरोपी दारूच्या नशेत होते. दरम्यान मृतक श्रीकांत आणि आरोपींमध्ये काही कारणावरून वाद निर्माण झाला. झटापटीत ज्ञानदीप निमसटकर यांनी श्रीकांतच्या डोक्या तोंडावर लाकडी दांडयाने मारले. यातच त्याचा मृत्यू झाला. आरोपींनी स्वतःला वाचविण्यासाठी घटनेला अपघाताचे रूप देण्याचा प्रयत्न केला. मृतकाची गाडी घटनास्थळापासून दूर नेऊन रस्त्यावर टाकली. तर मृतकाचा अपघात झाला असे दाखवित स्वतःच तिघांनी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले. मात्र घटनेचं गांभीर्य लक्षात घेता डॉक्टरांनी पोलीसांना कळविले. नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी तपासाची चक्र फिरवीत सर्व आरोपींना अटक केली आहे.
निकेश जिलठे - संपादक वणी बहुगुणी
2007 पासूून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. ग्रामीण व शहरी असा पत्रकारितेचा अनुभव. आजतक, झी, जय महाराष्ट्र, टीव्ही 9 इत्यादी आघाडीच्या टीव्ही मीडियात मुंबई येथे विविध पदावर 10 वर्ष कार्यरत. सध्या एका पीआर एजन्सीचे संचालक तसेच वणी बहुगुणी या वेबसाईटचे मुख्य संपादक. यवतमाळ जिल्ह्यातील पहिले न्यूज पोर्टल वणी बहुगुणी या स्थानिक न्यूज पोर्टलच्या माध्यमातून परिसरातील ज्येष्ठ व नव्या दमाच्या पत्रकारांसह वणी व परिसरातील बातम्या व ताज्या घडामोडी पोहोचवण्याचा एक प्रयत्न. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक विषयावर विविध माध्यमात लिखाण. राज्यातील अनेक ज्येष्ठ नेते व मंत्री यांचे मीडिया कन्सलटन्ट म्हणूनही कार्य.
Next Post