रविवारी निघालेत 2 कोरोना पॉजिटिव्ह

एक आनंदनगरातील तर दुसरा अन्य ठिकाणचा

0

जब्बार चीनी, वणी: आज रविवारी दिनांक 4 ऑक्टोबर रोजी तालुक्यात कोरोनाचे 2 रुग्ण आढळून आलेत. आज आलेल्या अहवालानुसार एक कोरोनाबाधित आनंदनगरातील आहे. तर दुसरा अन्य ठिकाणचा आहे. आज आलेल्या रुग्णांमुळे कोरोनाची एकूण रुग्णसंख्या 653 झाली आहे.

रविवारी 2 व्यक्ती पॉजिटिव्ह आल्या आहेत. आज 29 संशयीतांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आलेत. अद्याप 48 अहवाल येणे बाकी आहेत. सध्या तालुक्यात एकूण 653 पॉजिटिव्ह रुग्ण झालेत. यातील 605 व्यक्ती कोरोनावर मात करून रिकव्हर झाले आहेत. सध्या तालुक्यात 48 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. तर कोरोनामुळे मृत्यूची संख्या 17 झाली आहे.

                                               आज 24 कोरोनामुक्त व्यक्तींना सुट्टी
आज कोरोना मुक्त झालेल्या 24 व्यक्तींना सुट्टी देण्यात आली. सध्या तालुक्यात 48 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. यातील 21 व्यक्तींवर कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरू आहे. तर 27 रुग्ण होम आयसोलेट आहेत. यवतमाळ येथील जीएमसी येथे 14 व्यक्तींवर उपचार सुरू आहेत. सध्या कोविड केअर सेन्टरमध्ये रुग्ण आणि संशयीत असे 21 व्यक्ती भरती आहेत.

(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)

 

Leave A Reply

Your email address will not be published.