दिवाळी अंकाची महाराष्ट्रीय परंपरा ‘शब्दोत्सव’ने पुढे चालवावी – दिलीप एडतकर

‘शब्दोत्सव’ दिवाळी अंकाचे थाटात प्रकाशन

0

सुनील इंदुवामन ठाकरे, अमरावती: दिवाळी अंकांची महाराष्ट्रात मोठी परंपरा आहे. नव्या पिढीने ही परंपरा जपली. प्रीती बनारसे रेवणे ही नव्या पिढीतली संपादक धाडसाने दिवाळी अंक काढते, ही गौरवास्पद आणि कौतुकास्पद बाब आहे. ‘शब्दोत्सव’ या दिवाळी अंकाने ही परंपरा पुढे चालवावी. कोरोनाच्या या काळात अनेकजण आर्थिक संकंटांचा सामना करीत आहेत.

त्यातही एक तरूणी एक दर्जेदार दिवाळी अंक काढते, ही अभिमानास्पद बाब आहे. असे प्रतिपादन या अंकाचे प्रकाशक तथा दैनिक विदर्भ मतदारचे संपादक दिलीप एडतकर यांनी काढले. ‘शब्दोत्सव’ या दिवाळी अंकाच्या प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते. दिवाळीच्या पूर्वसंध्येला सातुर्णा एम.आय.डी.सी. स्थित ममता प्रकाशनच्या कार्यालयात या अंकाचे प्रकाशन झाले.

यावेळी विचारपीठावर दिलीप एडतकर, वंदना एडतकर, भालचंद्र रेवणे, अविनाश दुधे, डॉ. मोहना कुळकणी आणि शब्दोत्सवच्या संपादक प्रीती बनारसे रेवणे उपस्थित होते.

या प्रकाशन सोहळ्याला सनत आहाळे, डॉ. सतीश पावडे, डॉ. निशा शेंडे, सुनील यावलीकर, अनिता कुळकर्णी, संगीता हातगावकर, डॉ. हेमंत खडके, शोभा गायकवाड, हर्षल रेवणे, वासुदेव बनारसे, शशिकला बनारसे, सारिका तेलंग, संकेत आहाळे, संजय बनारसे प्रामुख्याने उपस्थित होते.

प्रास्ताविक भूमिका शब्दोत्सवच्या संपादक प्रीती बनारसे यांनी मांडली. महाविद्यालयीन जीवनापासून विविध कॉलेज मॅगझिन्सच्या संपादनाचा अनुभव कामात आल्याची प्रामाणिक कबुली त्यांनी दिली. स्त्रिविषयावर अंक काढणं हे दिव्यच होतं. त्यात परिवाराने आणि हितचितंकानी त्यांना मोलाची साथ दिली. त्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

‘शब्दोत्सव’ दिवाळी अंकाचं अवलोकन करताना प्रा. प्रसेनजीत तेलंग, प्रा. डॉ. सतीश पावडे आणि चित्रकार सुनील यावलीकर

मीडिया वॉचचे संपादक अविनाश दुधे यांनी शब्दोत्सव दिवाळी अंकाचा धावता आढावा घेतला. त्यातही संपादक प्रीती बनारसे रेवणे यांचे कौतुक केले. त्यांच्या प्रतिभेच्या कक्षा खूप मोठ्या असल्याचंही ते यावेळी म्हणालेत. शब्दोत्सवचा अंक देखणा आणि दर्जेदार आहे. अत्यंत समर्पण भावनने संपूर्ण टीमने यावर घेतलेले परिश्रम या अंकातून झळकतात, असंही ते यावेळी म्हणालेत.

प्रकाशन सोहळ्याच्या प्रमुख अतिथी डॉ. मोहना कुळकर्णी यांनी दिवाळी अंकाच्या परंपरेवर चर्चा केली. दिवाळी अंकाच्या संपादक म्हणून प्रीती बनारसे रेवणे यांच्या कार्यकुशलेची त्यांनी दखल घेतली. दर्जेदार साहित्य, साहित्यिक आणि रसिक चोखंदळ वाचक यांच्यातला दुवा संपादक असतो. त्याला दोन्ही बाजूंचा अभ्यास करून अंकाची मांडणी करावी लागते. हा समन्वयात्मक समतोल शब्दोत्सव दिवाळी अंकाने सांभाळल्याबद्दल त्यांनी टीमचे अभिनंदन केले.

शब्दोत्सव दिवाळी अंकावर भाष्य करताना प्रा. अविनाश दुधे

डॉ. निशा शेंडे यांनी शब्दोत्सवाच्या वाड्मयीन मूल्यांवर चर्चा केली. स्त्रियांच्या भावविश्वाचा साहित्यातला अविष्कार यावरही उहापोह केला. प्रीती यांनी या अंकातून हे विश्व व्यापक केल्याचंही त्या यावेळी म्हणाल्यात.

शब्दोत्सव दिवाळी अंकाचं मुखपृष्ठ ख्यातनाम चित्रकार सुनील यावलीकर यांनी काढलं. त्यावर त्यांनी रसाळ भाष्य केलं. शब्दोत्सव दिवाळी अंकाची थीम ‘मास्क’ आहे. मुखपृष्ठावरील स्त्रिप्रतीक, त्यावरील रंग, शैली यावर त्यांनी विवेचन केलं.

पत्रकार आणि लेखिक अनिता कुळकणी यांनी शब्दोत्सवाच्या विषयावर चर्चा केली. वेळेचं नियोजन करून दर्जेदार अंक काढल्याबद्दल त्यांनी शब्दोत्सवाच्या टीमचं कौतुकही केलं.

दैनिक विदर्भ मतदारचे कार्यकारी संपादक सनत आहाळे यांनी अंकातील साहित्याचर चर्चा केली. संपादक या नात्याने प्रीती यांनी घेतलेल्या विवेकी भूमिकेचं कौतुक केलं. एका विषयाच्या विविधांगी लेखनाचा वाचक आस्वाद घेतील अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.

प्रास्ताविक भूमिका मांडताना शब्दोत्सवच्या संपादक प्रीती बनारसे रेवणे

ज्येष्ठ नाटककार तथा रंगकर्मी प्रा. डॉ. सतीश पावडे यांनी शब्दोत्सवाच्या निमित्तानं अनुभवकथन केलं. अनेक वर्ष त्यांनी काढलेल्या दिवाळी अंकांचे अनुभव शेअर केलेत. विसाव्या शतकाच्या आरंभी तानुबाई बिरजे या महिला संपादक होत्या. त्यानंतर फारच मोजक्या स्त्रिसंपादक आल्यात. आजही स्त्री संपादकांची संख्या कमी आहे. शब्दोत्सवाची संपादक एक स्त्री असल्याने हा अंक एका वेगळ्या उंचीवर गेल्याचंही त्यांनी यावेळी म्हटलं.

साहित्यिक, समीक्षक प्रा. डॉ. हेमंत खडके यांनी शब्दोत्सव दिवाळी अंकावर स्तुतिसुमनांचा वर्षाव केला. दिवाळी अंक संस्कृती जपतात. दिवाळी अंकांच्या वाचनाने माणूस सुसंस्कृत होतो, असंही ते म्हणालेत. सुनील यावलीकरांनी काढलेल्या मुखपृष्ठावरही त्यांनी चर्चा केली. महिलांकडून पुरुषांचं प्रबोधन होणं आवश्यक असल्याचंही ते म्हणालेत.

साहित्यिक शोभा गायकवाड यांनी शब्दोत्सव दिवाळी अंकाच्या ‘मास्क’ आणि स्त्री या थीमवर चर्चा केली. विविध साहित्यातून आलेल्या स्त्रिविश्वावरही भाष्य केलं. संपादक प्रीती बनारसे रेवणे या मल्टिटॅलेंटेड आहेत. त्यांच्या प्रतिभेची चुणूक या अंकात पाहायला मिळते, असंही त्या म्हणाल्यात. संगीता हातगावकर यांनीदेखील शब्दोत्सवच्या दिवाळी अंकावर भाष्य केलं.

शब्दोत्सव दिवाळी अंकाच्या प्रकाशन सोहळा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अगदीच कौटुंबिक स्वरूपात झाला. सोशल डिस्टंसिंग आणि कोरोनाकाळातील सर्व नियमांचं पालन करून हा सोहळा झाला. कार्यक्रमाचं संचालन प्रा. प्रसेनजीत तेलंग यांनी केले. आभार भालचंद्र रेवणे यांनी मानलेत.

हेदेखील वाचा

उलगुलानचे जनक ‘धरती आबा’ बिरसा मुंडा

हेदेखील वाचा

प्रवीण खानझोडे: मजुरी ते व्यावसायिक… एका कार्यकर्त्याचा थक्क करणारा प्रवास…

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.