आजपासून मुकुटबन येथे सीसीआयची कापूस खरेदी सुरू
खासदार, माजी आमदार आणि युवक काँगेसच्या प्रयत्नांना यश
सुशील ओझा, झरी:– तालुक्यातील मुकुटबन येथे १९ नोव्हेंबर म्हणजे आजपासून सीसीआयची कापूस खरेदी सुरू करण्यात येत आहे. यवतमाळ जिल्ह्यात इतर ठिकाणी सीसीआयची कापूस खरेदी केंद्राला मंजुरी मिळाली होती. परंतु झरी तालुक्यातील मुकुटबन येथील केंद्राला वगळण्यात आले होते. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी हिरमुसले होते.
त्यांच्यावर अन्याय करण्यात आले होते. शेतकऱ्यांवर होणारा अन्याय पाहून तालुक्यातील युवक काँगेस सरसावली. मुकुटबन येथील सीसीआयची कापूस खरेदी सुरू केल्याशिवाय गप्प बसणार नाही. असा पवित्रा घेतला. याबाबत खासदार बाळू धानोरकर यांची भेट घेऊन सदर समस्या सांगितली. खासदार धानोरकर यांनी थोडेही विलंब न करता थेट केंद्रियमंत्री यांच्या पीएला फोन लावून मुकुटबन येथील कापूस कापूस केंद्र सुरू करा अशी विनवणी केली.
तसेच माजी आमदार वामनराव कासावार यांनीसुद्धा याचा पाठपुरावा केला. तालुक्यातील युवक काँग्रेसचे पदाधिकारी ,कार्यकर्ते व बाजार समितीचे संचालक एवढ्यावर न थांबता सभापती संदीप बुरेवार माजी संचालक नीलेश येल्टीवार, संचालक बळी पेंदोर, तालुका युवक काँगेस अध्यक्ष राहुल दांडेकर व इतर कार्यकर्त्यांनी कापूस खरेदी केंद्र सुरू न झाल्यास उपोषणाचा इशारा दिला होता.
सीसीआयची कापूस खरेदी जिल्ह्यातील इतर केंद्रावर सुरू करण्याकरिता मंजुरी देण्यात आली. मग मुकुटबन केंद्रावर खरेदी सुरू करण्यास काय अडचण असा संतप्त प्रश्न उपस्थित करून युवक काँग्रेस आक्रमक झाली होती. खासदार बाळू धानोरकर, माजी आमदार वामनराव कासावार, युवक काँग्रेस व कृषी उत्पन्न बाजारसमितीच्या प्रयत्नांना यश आले.
१९ नोव्हेंबर पासून सीसीआयची कापूस खरेदीचा शुभारंभ होत आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हिताकरिता झटणाऱ्या बाजार समितीचे सभापती संदीप बुरेवार, सचिव रमेश येल्टीवार, संचालक सुनील ढाले, राजीव आस्वले यांनी सदर खरेदीकेंद्राचे स्वागत केले आहे. शासकीय खरेदी सुरू होणार असल्याचे पाहून खाजगी बाजारभावात वाढ झाली आहे.
जिल्ह्यात सर्वाधिक कापूस उत्पादन व उच्च दर्जाचा कापूस फक्त झरी तालुक्यात आहे. मागील 2वर्षांत बाजार समितीने 92 हजार 18 क्विंटल 30 मेपर्यंत खरेदी करण्यात आली. बाजार समितीच्या सहकार्यामुळे कोणतीही अडचण न येता सुरळीत कापूस खरेदी करण्यात आली होती हे विशेष.
हेदेखील वाचा
हेदेखील वाचा