संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात भारतीय संविधानदिन

कुलुगुरुंनी केले संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन

1

बहुगुणी डेस्क, अमरावती: संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात 26 नोव्हेंबर हा भारतीय संविधान दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर यांनी संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले.

प्र-कुलगुरू डॉ. राजेश जयपूरकर, कुलसचिव डॉ. तुषार देशमुख, आअवि.चे संचालक डॉ. श्रीकांत पाटील, ननसामं चे संचालक डॉ. डी.टी. इंगोले तसेच विद्यापीठाचे अधिकारी, शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.

विद्यापीठातील डॉ. आंबेडकर अभ्यास केंद्रात भारतीय संविधान दिवस साजरा

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील डॉ. आंबेडकर अभ्यास केंद्रात 26 नोव्हेंबर हा भारतीय संविधान दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी तथागत गौतम बुद्ध आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन, हारार्पण व मेणबत्तीचे प्रज्वलन कुलगुरूंच्याहस्ते करण्यात आले.

यावेळी कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर यांनी संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले. प्र-कुलगुरू डॉ. राजेश जयपूरकर, कुलसचिव डॉ. तुषार देशमुख, आअवि. चे संचालक डॉ. श्रीकांत पाटील, डॉ. आंबेडकर केंद्राचे सह समन्वयक डॉ. गजानन मुळे तसेच विद्यापीठाचे अधिकारी, शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.

हेदेखील वाचा

तलावात उडी घेऊन इसमाची आत्महत्या

हेदेखील वाचा

गुरुवारी तालुक्यात आढळलेत 4 पॉजिटिव्ह

 

 

1 Comment
  1. […] संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात भा… […]

Leave A Reply

Your email address will not be published.