नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्यातील शेतकरी सध्या बोंडअळीने त्रस्त आहेत. विशाल किन्हेकार या युवा शेतकऱ्याने त्यामुळेच आपल्या शेतातील पराटीवर चक्क ट्रॅक्टर फिरवला. या शेतकऱ्याने आपल्या शेतात या वर्षी पराटी लावली होती .पराटीची झाडे मोठे होऊन लागली तशा त्याच्या आशाही पल्लवित झाल्यात.
या वर्षी आतापर्यंत त्यांना आठ एकरात 20 क्विंटलच कापसाचे उत्पन्न झाले. जेव्हा की गेल्या वर्षीच्या तुलनेत ते फारच कमी आहे. दरवर्षी होत असलेल्या उत्पन्नात सातत्याने मोठा तोटा सहन करावा लागत आहे. याची खंत त्यांनी व्यक्त केली. या वर्षी त्यांना 80ते 90 क्विंटल कापूस होईल अशी आशा होती.
परंतु बोंडअळीमुळे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेतीला लागणारा खर्चसुद्धा निघालेला नाही. आता पाराटीला कापसाची भरपूर बोंडं आहेत. परंतु सर्वत्र बोंडअळी आली. त्यामुळे त्रस्त शेतकऱ्याने आपल्या शेतात ट्रॅकर चालवून पराटी उपडून फेकली.
बळीराजा दरवर्षी आपल्या शेतात किती उत्पन्न होईल व त्याला किती खर्च लागेल याचा आराखडा तयार करतात. परंतु या वर्षी मात्र उलटे झाले. अनेक शेतकऱ्यांना आसमानी संकटासह सुलतानी संकटाचाही सामना करावा लागत आहे. या वर्षी पाऊस उशिरा आला.
त्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या शेतात दुबार, तिबार पेरणी करावी लागली. काही दिवसांत पाऊस चांगला आल्याने या वर्षी उत्पन्न चांगले होईलच अशी आशा शेतकऱ्यांना होती. परंतु सोयाबीन हातात येण्याच्या वेळेतच संततधार पावसाच्या तडाख्याने सोयाबीनची वाट लागली.
त्यामुळे हातात नगदी येणारे पीक मातीत गेले. त्यामुळे असंख्य शेतकऱ्यांचे नुकसान झाले. अस्मानी तांडव इथेच थांबले नाही तर संततधार पावसामुळे पराटीची सुरुवातीला लागलेली बोंडं सडू लागली. त्यामुळे शेतकऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
दरम्यान तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतातल्या कपाशीची झाडे उपटून फेकून दिली. मात्र कोणीही शेतीच्या बांधावर पोहचू नये ही शोकांतिका आहे. शेतकऱ्यांच्या नावावर केवळ राजकारण केले जात असल्याची खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
हेदेखील वाचा
हेदेखील वाचा