स्वराज्य शेतकरी युवा संघटनेच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन

नव्या कार्यकारणीत उपाध्यक्षपदी राजू मांदाडे, जिल्हाप्रमुखपदी सचिन पचारे

0

नागेश रायपुरे, मारेगाव: आगामी काळात येणाऱ्या ग्रामपंचायत, नगरपंचायतींच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्वराज्य शेतकरी युवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गजानन किन्हेकार यांच्या हस्ते येथील मार्डी रोडवर जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन करण्यात आले. सोबतच संघटनेची कार्यकारणी गठित करून पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या.

यावेळी स्वराज्य शेतकरी युवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गजानन किन्हेकार यांच्या नेतृत्वाखाली कार्यकारणी गठित करण्यात आली. यामध्ये संस्थापक उपाध्यक्षपदी राजू मांदाडे, जिल्हाप्रमुखपदी सचिन पचारे, वणी विधानसभाप्रमुखपदी विशाल किन्हेकार,

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

मारेगाव तालुकाप्रमुखपदी सोमेश्वर गेडेकर, तालुका संघटकपदी अनिल राउत, तालुका सचिवपदी भाष्कर पेचे, उप तालुकाप्रमुखपदी विकास राऊत, शहरप्रमुखपदी प्रवीण काळे, शहर संघटकपदी विजय मेश्राम, शहर सचिवपदी सैलानी खान शेर खान पठाण, उपशहरप्रमुखपदी सूरज वाढई व उमेश उलमाले,

उपशहर संघटकपदी पंकज भट व आशीष दानखडे तसेच विभागप्रमुख म्हणून राजू खडसे, तुकाराम वासाडे, अमोल घोरपडे, सुरेश पेंदोर यांची निवड करण्यात आली. 

हेदेखील वाचा

आज तालुक्यात 5 पॉजिटिव्ह

हेदेखील वाचा

येदलापूरच्या निकृष्ट वॉलकंपाउंडची अधिकाऱ्यांनी केली पाहणी

Leave A Reply

Your email address will not be published.