जब्बार चीनी, वणी: जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदासाठी सोमवारी दिनांक 21 डिसेंबर रोजी जिल्ह्यातील 29 केंद्रावर मतदान झाले. 19 जागांसाठी भाजप समर्थीत शेतकरी सहकार विकास आघाडी व महाविकास आघाडी अशी थेट लढत आहे. वणी, मारेगाव, झरी या तालुका गटात महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी बाजी मारली. वणी येथे महाविकास आघाडी पॅनलचे टिकाराम कोंगरे, मारेगाव येथे संजय देरकर तर झरी येथे राजू येल्टीवार विजयी झाले आहे.
कुणाला किती मते मिळाली?
तालुका गट वणी येथे 68 मतदार होते. यात टिकाराम कोंगरे यांना 42 मते मिळाली तर विनायकराव एकरे यांना 25 मते मिळाली. एक मत बाद झाले. मारेगाव तालुका गटात एकूण 22 मतदार होते. यात संजय देरकर यांना 14 मते तर नरेंद्र ठाकरे यांना 8 मते मिळाली. झरी तालुका गटात एकूण 18 मतदार होते. यात राजू येल्टीवार यांना 11 मते तर नरेंद्र बोदकुरवार यांना 7 मते मिळाली.
मतदारांना आला चांगलाच ‘भाव’
अनेक दिग्गज यावेळी या निवडणुकीच्या आखाड्यात उतरले होते. अनेक उमेदवारांची तिकीट नाकारले गेल्याने नाराजी होती. त्यामुळे मोठ्या प्रमाणात क्रॉस व्होटिंगची शक्यता वर्तवण्यात आली होती. त्यातच भाजप विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट व अत्यंत चुरशीची लढत होणार असल्याने मतदारांचा चांगलाच ‘भाव’ वधारला होता. वणीमध्ये हा ‘भाव’ 1 ते दीड लाख, मारेगावमध्ये सुमारे 5 लाख तर झरी सारख्या मागास भागात हा ‘भाव’ 10 लाखांपर्यंत गेल्याची चर्चा परिसरात चांगलीच रंगत आहे.
वृत्त लिहे पर्यंत जिल्ह्याची स्थिती अद्यापही स्पष्ट झाली नसली तरी वणी, मारेगाव व झरी तालुक्यात महाविकास आघाडीने बाजी मारली आहे. यवतमाळ येथे राधेशाम अग्रवाल, कळंब येथे बाबू पाटील वानखडे, बाभूळगाव येथे अमन गावंडे, केळापूर (पांढरकवडा) येथे प्रकाश मानकर तर घाटंजी येथे आशिष लोणकर विजयी झाल्याची माहिती आहे. सध्या महाविकास आघाडी 11 विरुद्ध 8 ने समोर आहे.
हे देखील वाचा:
हे देखील वाचा: