मुकुटबनचा सरपंच बनण्याचे लागले अनेकांना वेध

समाज व जातीचे समीकरण जोडण्यात पुढारी व्यस्त

0

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील 15 सदस्य असलेली तसेच लोकसंख्येने मोठी मुकुटबन ग्रामपंचायत आहे. मुकुटबन ग्रामपंचायतीचा सरपंच बनण्याकरिता अनेकांना वेध लागल्याचे चित्र पहायला मिळत आहे. ग्रामपंचायतीमध्ये 5 वॉर्ड आहेत. प्रत्येक वॉर्डात 3 सदस्य असे एकूण 15 सदस्य निवडून आणायचे आहेत.

याकरिता काँग्रेस, बीजेपी तसेच माजी सरपंच शंकर लाकडे यांचे पॅनल व एक वेगळे पॅनल लढण्याची तयारी दिसत आहे. इच्छुक व स्वछ प्रतिमा तसेच गावाच्या विकासाकरिता कार्य करणाऱ्या उमेदवारांच्या शोधात सर्वच गटातील गावपुढारी भटकत आहे.

12 ते 15 हजार लोकसंख्या असलेल्या मुकुटबन येथे खाजगी सिमेंट फॅक्टरी आल्यामुळे सर्वांनाच सरपंच होण्याचे स्वप्न पडू लागले आहे. परंतु गावाच्या विकासाचा विचार करून निवडणूक लढवावी असे कुणाच्याच तोंडून ऐकला मिळत नाही.

प्रत्येक पॅनलमध्ये फक्त आपल्या समाजाचा, आपल्याच जातीचा सरपंच व्हावा असे स्वप्न पाहत आहे व चर्चाही तशीच ऐकायला मिळत आहे. काही पॅनलला उमेदवारच मिळत नसल्याची चर्चा गावात सुरू आहे. उमेदवारांचे घरटॅक्स कोण भरणार व उमेदवार म्हणून उभे कसे करणार असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.

तर गावातील युवकांना आतापासूनच भूलथापा व विविध आमिष दाखविणे सुरू झाले आहे. त्यामुळे निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापायला लागले आहे. यापूर्वी सरपंच शंकर लाकडे, उपसरपंच अरुण आगुलवार यांच्या नेतृत्वात गावात मोठ्या प्रमाणात विकास कामे करण्यात आलीत.

झालेली विकासकामे संपूर्ण गावकऱ्यांना माहीत आहे. त्यामुळे जनतेने गावाचा विकास करणारे उमेदवार कोण, याकडे जनता पाहत आहे. उमेदवाराची चाचपणी करूनच मतदान करणार असल्याची चर्चा जनता करीत आहे.

सरपंच आपल्याच गटाचा व्हावा याकरिता सर्वच पक्ष कामी लागले आहे. जे उमेदवार निश्चित झालेत, त्यांनी तर घरोघरी फिरून आतापासूनच प्रचार सुरू केला आहे. निवडणुकीत लाखो रुपयांचा खर्च करून ओल्या पार्ट्याचा तसेच पैसा व दारू वाटपाचा ही हिशोब लावणे सुरू झाले आहे.

जनतेसमोर स्वछ प्रतिमा व गावविकास करण्याची क्षमता असलेल्या व्यक्तींनाच मुकुटबन ग्रामवासी निवडून देणार हे निश्चित. परंतु दारू व पैश्याचा वाटप जनतेला संभ्रम निर्माण करू शकते.

हेदेखील वाचा

कोरोनाचे तांडव सुरूच… शनिवारी 17 पॉजिटिव्ह

हेदेखील वाचा

कडाक्याच्या थंडीत शेकोट्यांवर रंगतायेत निवडणुकीच्या गरमागरम चर्चा

हेदेखील वाचा

कमी दरात सोने विकण्याचे आमिष दाखवून सिनेस्टाईल लूट

Leave A Reply

Your email address will not be published.