माजी मुख्यमंत्री दादासाहेब कन्नमवार यांच्या जयंती साजरी

रक्तदान शिबिरात 46 रक्तदात्यांनी केले रक्तदान

0

विवेक तोटेवार, वणी: महाराष्ट्र राज्याचे दुसरे मुख्यमंत्री दादासाहेब कन्नमवार यांची जयंती रविवारी कन्नमवार चौक येथे साजरी करण्यात आली. जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. रक्तदान शिबिरात 46 रक्तदात्यांनी रक्तदान केले.

कर्मवीर दादासाहेब कन्नमवार जयंती सोहळा कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा बेलदार समाज बहुउद्देशीय संस्था वणीचे अध्यक्ष प्रदीप बोनगिरवार, प्रमुख पाहुणे राष्ट्रीय प्रबोधनकार विकास चिडे गुरुजी, संस्थेचे कार्याध्यक्ष तथा नगरसेवक राकेश बुग्गेवार, महिला कार्यकारी अध्यक्ष अल्का दुधेवार,

शहर कार्यकारिणी अध्यक्ष संदीप मुत्यलवार, ओबीसी जातनिहाय जनगणना कृती समितीचे निमंत्रक मोहन हरडे, संस्थेचे सचिव पांडुरंग ताटेवार, प्रा. राम मुडे, विदर्भ बेलदार संघटना महाराष्ट्राचे प्रांतीय उपाध्यक्ष अरविंद गांगुलवार होते. संचालन सागर बरशेट्टीवार यांनी केले.

प्रस्तावनेतून गजानन चंदावार, कर्मवीर दादासाहेब कन्नमवार यांच्या विषयी सविस्तर माहिती देऊन लोकनेते कर्मवीर दादासाहेब कन्नमवार, महाराष्ट्र राज्याचे दुसरे मुख्यमंत्री यांची शासकीय स्तरावर जयंती व्हावी यासाठी २०१३ पासून शासनाकडे बेलदार समाज, विविध भटके विमुक्त संघटना पत्रव्यवहार करत आहे.

तरी २०२१ रोजी थोर महापुरुषांच्या जयंती स्मृतिदिन साजरे करण्यासंदर्भात १५ डिसेंबर २०२० रोजी सामान्य प्रशासन विभागाचे शासन परिपत्र जारी करण्यात आले. या शासन परिपत्रात याही वेळी महाराष्ट्र राज्याचे दुसरे मुख्यमंत्री, स्वातंत्र्य सेनानी लोकनेते कर्मवीर मारोतराव सांबशिवपंत (दादासाहेब) कन्नमवार यांच्या जयंती, पुण्यतिथीचा उल्लेख नव्हता.

शासनाने ही चूक दुरूस्त करावी यासाठी कर्मवीर दादासाहेब कन्नमवार प्रचार व प्रसार समिती महाराष्ट्र तर्फे मुख्यमंत्री, सामाजिक न्यायमंत्री, सामान्य प्रशासन मंत्री, मुख्य सचिव महाराष्ट्र यांना १५०० ते २००० ईमेल महाराष्ट्रातून विविध ठिकाणाहून पाठवले. तसेच पत्रव्यवहारही केला.

 

तरीही याही सरकारला कर्मवीर स्वातंत्र्य सेनानी यांचा विसर पडला, यापुढे कर्मवीर दादासाहेब कन्नमवार प्रचार समिती महाराष्ट्र तर्फे शासकीय जयंती पुण्यतिथीसाठी राज्यभर आंदोलन उभारणार असे सांगितले.

राष्ट्रीय प्रबोधनकार विकास चिडे गुरुजींनी दादासाहेब कन्नमवार यांच्या जीवनचरित्राचा प्रसार व्हावा याकरिता संपूर्ण महाराष्ट्रात प्रबोधन करणार आणि इतरही प्रबोधनकार यांना माहिती देईल असे आपल्या मनोगतातून बोलले. संस्थेचे कार्याध्यक्ष तथा नगरसेवक राकेश बुग्गेवार यांनी असा लोकनेता महाराष्ट्राच्या भूमीवर जन्म घेतला.

सामान्य कुटुंबात जन्म घेऊनही आपल्या कार्यकर्तृत्वाने मुख्यमंत्री पदावर पोहचले. त्यांचा आदर्श घेऊन समोर जाऊ असे बोलले. बेलदार समाज बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रदीप बोनगिरवार यांनी कर्मवीर दादासाहेब कन्नमवार यांचा प्रचार व प्रसार विविध पद्धतीने महाराष्ट्र भर करू असे म्हणाले. आभार सत्यजित ठाकूरवार यांनी मानले. यानंतर लगेच रक्तदान शिबिराला सुरुवात झाली. रक्तदान शिबिराचे यशस्वीतेकरिता विशेष सहयोग राजू दासरवार यांनी दिले.

या कार्यक्रमात राकेश, बरशेट्टीवार, अमोल मसेवार, विनोद महाजनवार, महेश संगेनवार, राजू दासरवार, संतोष कोमरेड्डीवार, अशोक ठाकूरवार, ज्ञानेश्वर बोनगिरवार, श्रीनिवास एडलावार, पुरुषोत्तम कोमरेड्डीवार, नंदू जुब्बेवार, प्रकाश पत्तीवार, रोहन आदेवार, किशोर मुत्यलवार,

राजू बोईनपेल्लीवार, श्रीकांत पोचमपेल्लीवार, रेखा बोनगिरवार, काजल पुरमशेट्टीवार, डॉ. प्रांजल दुधेवार, दीपाली कोमरेड्डीवार, मधुश्री चंदावार तसेच बेलदार समाज बहुउद्देशीय संस्था, वणी, युवा बेलदार शहर कार्यकारिणी, वणी, बेलदार समाज महिला कार्यकारिणी वणीचे सर्व पदाधिकारी तथा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेदेखील वाचा

बेपत्ता असलेल्या इसमाचा अखेर मृतदेहच आढळला

हेदेखील वाचा

मुख्यमंत्री होण्यापूर्वी “ते” वणी, माजरीला विकायचे किरकोळ सामान….

हेदेखील वाचा

साई लॅपटॉप व कॉम्प्युटर गॅलरीमध्ये मकरसंक्रांती ऑफर

 

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.