सुशील ओझा, झरी: तालुक्यातील पाटण पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या अनेक गावात खुलेआम मटका पट्टी फाडणे सुरू आहे. मटका जुगारामुळे गावासह तेलंगणातील व परिसरातील शौकीन मोठ्या प्रमाणात मटका जुगार खेळण्याकरिता गर्दी करीत आहे. पाटण येथे पोलीस ठाण्याजवळच तसेच महाराष्ट्र बँक, आझाद चौक व बोरी मार्गावरील पेट्रोलपंप जवळ मटका पट्टी फाडणे सुरू आहे.
मटका धंदा 4 ते 5 जण मिळून करीत आहे. मटका जुगार धंद्यात अनेक शेतकरी गरीब व तरुण युवक गुरफटले अडून अनेकांचे घर उध्वस्त झाले आहे. दररोज लाखो रुपयांची पट्टी फाडत असल्याची माहिती असून याकडे पोलिसांचे ‘अर्थ’पूर्ण संबंध असल्याने अडल्याने “डोळे असून आंधळ्याचे सोंग” घेऊन असल्याचे चित्र आहे.
पाटण पोलीस स्टेशनच्या अगदी जवळ व इतर ठिकाण हाकेच्या अंतरावर असून सुद्धा कोणतेही कार्यवाही केल्या जात नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी जिल्ह्यातील संपूर्ण पोलीस ठाणे अंतर्गत सुरू असलेले अवैध धंदे बंद करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र असे असताना पाटण येथे खुलेआम मटका पट्टी फाडणे सुरू आहे.
जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत असल्याचे चित्र पाटण येथे पाहायला मिळत आहे. ठाणेदार व स्थानिक बिट जमादार याला सर्वस्वी जवाबदार असल्याची ओरड काही ग्रामवासी करीत असून सदर मटका चालकांवर कार्यवाही करून मटका जुगार बंद होणार काय असा प्रश्न ग्रामवासी करीत आहे.
हे देखील वाचा:
सेक्स रॅकेटबाबत नागरिक संतप्त तर पोलीस प्रशासन उदासिन (भाग 7)