विधवेची विम्याच्या लाभासाठी दीड वर्षांपासून पायपिट

प्रहार ग्राहक संघटनेने दिला तीव्र आंदोलनाचा इशारा

0

नागेश रायपुरे, मारेगाव: पतीच्या मृत्यू नंतर प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेच्या लाभापासून वंचित असलेल्या एका विधवेची गेल्या दीड वर्षांपासून सेंट्रल बॅंक शाखा मारेगाव येथे पायपीट सुरू आहे. मात्र अद्यापही बँकेकडून महिलेला उडवाउडवीची उत्तरे मिळत आहे. आता या महिलेने ग्राहक प्रहार संघटनेकडे धाव घेतली आहे. संघटनेने येत्या आठ दिवसात महिलेला विम्याची रक्कम न मिळाल्यास तीव्र आंदोलन करू असा इशारा दिला आहे.

कल्पना गजानन मिलमिले रा. सालेभटी असे विम्याच्या लाभा पासून वंचीत असलेल्या विधवा महिलेचे नाव आहे. गजानन मिलमिले यांनी सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया शाखा मारेगाव या बॅंकेत प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा काढला होता. विम्याचे हप्ते नियमित त्यांच्या खात्या मधून कपात होत होते. दरम्यान दिनांक 12/3/2019 रोजी त्यांचा अकस्मात मृत्यू झाला.

पतीच्या मृत्यू नंतर कल्पना गजानन मिलमिले यांनी बॅंकेत लागणारी सर्व मूळ कागदपत्रे जमा केली. कागदपत्रे जमा केल्यानंतर नियमाने पंधरा दिवसा नंतर त्यांचे खात्यात विम्याचे रक्कम जमा होणे अपेक्षित होते. मात्र येथील सेंट्रल बॅंकेत विम्याच्या रकमेसाठी या विधवा महिलेची गेल्या दीड वर्षा पासून पायपीट चालू आहे. मात्र बॅंक व्यवस्थापक कडून समाधानकारक उत्तर मिळत नव्हते.

तक्रारीची कोणीच दखल घेत नसल्यामुळे 8 मार्च जागतिक महीला दिनी ह्या महिलेने ग्राहक प्रहार संघटनेचे तालुका अध्यक्ष सचिन मेश्राम व पत्रकार नागेश रायपुरे यांच्या मदतीने ग्राहक प्रहार संघटनेचे जिल्हा सचिव प्रसाद नावलेकर यांच्या कडे तक्रार दाखल केली. तक्रार करताच प्रसाद नावलेकर यांनी शाखा व्यवस्थापक यांच्याशी संपर्क केला. मात्र ते समाधानकारक उत्तर देऊ न शकल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. अधिका-यांनी लवकरात लवकर न्याय देऊ असे आश्वासन दिले.

ग्राहक प्रहार संघटनेचे समाधान न झाल्याने थेट मा. पंतप्रधान कार्यलया कडे तक्रार करण्यात आली असून एक प्रत जिल्हाधिकारी ह्यांचे कडे पाठविण्यात आली आहे. येत्या 20 मार्च पूर्वी ह्या विधवा महिलेस विम्याची रक्कम न मिळाल्यास महिलेस सह संघटनेचे कार्यकर्ते बँके समोर उपोषणास बसतील असा इशारा जिल्हा अध्यक्ष डॉ राजेंद्र आत्राम ह्यांनी दिला आहे.

हे देखील वाचा:

शनिवारी संध्याकाळपासून लागणा-या लॉकडाऊनला स्थगिती

ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना आता मिळणार थंड हवा

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.