नागेश रायपुरे, मारेगाव: “कोविड 19” चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अवघ्या जिल्ह्यासह मारेगाव तालुक्यातसुद्धा कुंभा गाव वगळता अनेक गावांत कोरोना लसीकरण केंद्र सुरू आहे. कुंभा येथे लसीकरण केंद्र तत्काळ सुरू करण्याच्या मागणीसाठी युवा सेना तालुका शाखा मारेगावच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
तालुक्यातील कुंभा हे गाव 10 ते 15 गावाचे केंद्रबिंदू असून गावाच्या आसपास आदिवासीबहुल गावखेडे, पोड, वस्ती आहे. मात्र कुंभा येथे लसीकरण केंद्र नसल्याने परिसरातील नागरिकांना कोरोनाची लस घेण्यासाठी तालुका स्थळावर यावं लागत आहे.
सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी असल्याने वाहतूक सेवाही काही प्रमाणात कमी झाली आहे. तसेच कुंभा ग्रामस्थांना व कुंभा परिसरातील गाव खेड्यातील नागरिकांना मारेगाव येथे लस घेण्यासाठी येणे जाणे करणे परवडत नसल्याने कुंभा परिसरातील हजारो नागरिक कोरोनाच्या लसीकरण मोहिमेपासून वंचित आहेत.
कुंभा परिसरातील “कोविड 19” विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कुंभा येथे “कोरोना लसीकरण केंद्र” तत्काळ सुरू करण्याच्या मागणीसाठी युवा सेना तालुका शाखा मारेगावच्या वतीने तहसीलदार व आरोग्य विभागाला निवेदन देण्यात आले.
यावेळी शिवसेनेचे तालुका प्रमुख तथा उपसभापती संजय आवारी, युवा सेनेचे तालुका प्रमुख मयुर ठाकरे, ता.संघटक श्रीकांत सांबजवार,उपसरपंच गजानन ठाकरे,मारोती मुपीडवार,भुपेंद्र डाहुले आदी उपस्थित होते.
हेदेखील वाचा
हेदेखील वाचा