आज तालुक्यात 75 पॉजिटिव्ह

5 कोरोनाबाधितांचा मृत्यू

0

जब्बार चीनी, वणी: आज दिनांक 26 एप्रिल रोजी तालुक्यात कोरोनाचे 75 रुग्ण आढळलेत. आज तालुक्यात 75 व्यक्ती पॉझिटिव्ह आलेत. यात वणी शहरातील 27 रुग्ण, ग्रामीण भागात 41 रुग्ण तर अन्यत्र 07 रुग्ण आहेत. आज शहर व परिसरात 05 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला.यात 61, 76 वर्षीय पुरुष तर 50 व 52 वर्षीय महिलांचा समावेश आहे. यासह एका 42 वर्षीय महिलेचा खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

वणीतील जैन ले आऊट4, भीमनगर 2, सेवानगर 2, रंगारीपुरा 2, रवीनगर 2, आणि वरद अपार्टमेंट, गौरक्षण, गुरुनगर, इंदिरा चौक, तेली फैल, अमीर टॉवर, पंचशील नगर, भोंगळे ले आऊट, हिराणी ले आऊट, जैताईनगर, विठ्ठलवाडी, माळीपुरा, जिल्हा परिषद कॉलनी, नारायण निवास परिसर, साईनगरी या भागांत प्रत्येकी 1 रुग्ण आढळला.

ग्रामीण भागात नायगाव (बु.)5, लालगुडा 5, वाघदरा 4, चिखलगाव 4, भालर कॉलनी 4, कायर 3, उकणी 2, छोरीया ले आऊट गणेशपूर 2, भालर 2, खांदला, मुर्धोनी, कुंभारखणी वसाहत, मोहदा, शिरपूर, नांदेपेरा, झरपट, कोलार पिंपरी, पुनवट येथे प्रत्येकी 1 रुग्ण आढळला.

आज सध्या तालक्यात ऍक्टिव्ह कोरोना रुग्णांची संख्या 608 झाली आहे. आज 63 कोरोनामुक्त रुग्णांना सुटी देण्यात आली.

आज यवतमाळ येथून 271 अहवाल प्राप्त झालेत. यात 45 व्यक्ती पॉझिटिव्ह आलेत. याशिवाय आज 164 संशयीतांची रॅपिड ऍन्टीजन टेस्ट करण्यात आली. यात 30 व्यक्ती पॉजिटिव्ह आलेत. तर 134 निगेटिव्ह आलेत. आज आलेल्या रुग्णांवरून 390 संशयीतांचे स्वॅब यवतमाळ येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले. अद्याप यवतमाळहून 1402 संशयीतांचे रिपोर्ट येणे बाकी आहे.

सध्या तालुक्यात 608 ऍक्टिव्ह रुग्ण (शासकीय लॅबच्या आकड्यानुसार) आहेत. यातील 30 रुग्ण कोविड केअर सेंटरला उपचार घेत आहेत. तर 539 रुग्ण होम आयसोलेट आहेत. 39 रुग्णांवर यवतमाळ व इतर ठिकाणी उपचार सुरू आहेत.

तालुक्यात कोरोनाचे एकूण 2781 रुग्ण आढळून आलेत. यातील 2131 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तरआतापर्यंत 42 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. (यात बाहेरगावी उपचार सुरू असताना मृत झालेल्या रुग्णांचा समावेश नाही.)

हे देखील वाचा:

नखांसाठी वाघिणीची निर्घृण शिकार, मांगुर्ला जंगलातील घटना

 हे देखील वाचा:

लॉकडाऊनमध्ये मयूर मार्केटिंगतर्फे ऑनलाईन सेवा सुरू

 

 

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.