नागेश रायपुरे, मारेगाव: आज 22 में रोजी तालुक्यात केवळ 3 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहे. यात ग्रामीण भागातील 2 शहरातील 1 रुग्णांचा समावेश आहे. यातील 1 पुरुष तर 2 महिला आहे. तर दुसरीकडे 14 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
आज आरोग्य विभागाने 293 व्यक्तींचे रॅपीड ऍन्टिजन टेस्ट केली. त्यात केवळ 3 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहे. यात मारेगाव शहरातील 1 तर ग्रामीण भागातील 2 असे केवळ 3 पॉझिटिव्ह आहेत. आज 803 व्यक्तींचे आरटीपीसीआर टेस्ट केली असता ते नमुने यवतमाळ येथे तपासणी साठी पाठवण्यात आले आले. अद्याप 1712 व्यक्तींचे रिपोर्ट पेंडिंग आहे.
तालुक्यात सध्या 172 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. यात कोविड सेंट वर 25 रुग्ण उपचार घेत आहे तर 129 होम आयसोलेट आहे. डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटरवर 7 तर 11 रुग्ण खासगी रुग्णालयात उपचार घेत आहे. तालुक्यात दिवसेंदिवस पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या कमी होत असल्याने दिलासा मिळत आहे.
हे देखील वाचा: