डोर्ली येथे कोविड तपासणी शिबिर

200 पैकी केवळ 1 पॉजिटिव्ह

0

नागेश रायपुरे, मारेगाव: टाकळखेडा गट ग्राम पंचायत अंतर्गत तालुक्यातील डोर्ली येथे आज कोविड तपासणी शिबीर झाले. यात गावातील 200 व्यक्तींची तपासणी केली असता त्यात केवळ 1 पॉजिटिव्ह रुग्ण आढळला आहे.

तालुक्यात गेल्या महिन्याभरात ग्रामीण भागात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठया झपाट्याने वाढत होता. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अर्चना देठे यांच्या मार्गदर्शनात आरोग्य विभागाकडून तालुक्यातील प्रत्येक गाव खेड्यात कोविड तपासणी शिबिर घेण्यात येत आहे.

त्याचाच एक भाग म्हणून आज 22 में रोजी तालुक्यातील डोर्ली येथे कोविड तपासणी शिबिर घेण्यात आले. या शिबिराला ग्रामस्थांनी प्रतिसाद देत 200 नागरिकांनी आपली कोविडची रॅपीड टेस्ट केली. त्यात केवळ 1 पॉझिटिव्ह रुग्ण आढळला.

या शिबिरासाठी सरपंच डॉ. नगराळे, उपसरपंच वैष्णवी मोहन शेंडे, सर्व ग्रा.प.सदस्य, अंगणवाडी सेविका किरण नगराळे, आशा वर्कर भेले, शिपाई वामन डोंगे, मोहन शेंडे व प्राथमिक आरोग्य केंद्र वेगावचे वैद्यकीय अधिकारी डॉ. कोडापे व आरोग्य कर्मचारी आदींनी परिश्रम घेतले.

हेदेखील वाचा

तालुक्याची कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरू

हेदेखील वाचा

कौटुंबिक वादातून आपसात भिडले सगेसोयरे, दोघे जखमी

हेदेखील वाचा

मारेगाव तालुक्याला दिलासा, आज अवघे 3 रुग्ण

Leave A Reply

Your email address will not be published.