आज केवळ 1 पॉझिटिव्ह तर 19 रुग्णांनी केली कोरोनावर मात

मारेगाव तालुक्यात ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 66

0

नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्याची आता कोरोनामुक्तीकडे वाटचाल होत असल्याने काहीसा दिलासा मिळत आहे.आज 2 जून रोजी आरोग्य विभागाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार आज तालुक्यात केवळ 1 पॉझिटिव्ह रुग्ण आढळला आहे. यात ग्रामीण भागातील एका पुरुषाचा समावेश आहे. तर दुसरीकडे तालुक्यातील 19 रुग्णांनी कोरोनावर मात करत बरे होऊन घरी परतले आहे.

आज आरोग्य विभागाने 21 व्यक्तींची रॅपीड ऍन्टिजन टेस्ट केली असता त्यात केवळ एक पॉझिटिव्ह रुग्ण आढळला आहे. तसेच आज 113 व्यक्तींची आरटीपीसीआर टेस्ट केली असून ते रिपोर्ट यवतमाळ येथे तपासणी करिता पाठवण्यात आले आहे. तसेच 345 व्यक्तीचे रिपोर्ट पेंडिंग आहे.

तालुक्यात सध्या 66 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. यात कोविड सेंटरवर 16 रुग्ण उपचार घेत आहेत, तर 44 होम आयसोलेट आहे. डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटरवर 2 तर 3 रुग्ण खासगी रुग्णालयात उपचार घेत आहे.

हेदेखील वाचा

एलसीबीच्या पथकाची शहरात ठिकठिकाणी धाड

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

हेदेखील वाचा

धक्कादायक: जिवंत असलेला शेतकरी शासन दरबारी मयत

हेदेखील वाचा

अखेर शटर वरती… दुकाने सजली, बाजारपेठ फुलली

 

Leave A Reply

Your email address will not be published.