जितेंद्र कोठारी, वणी: कृषी केंद्राच्या गोडाऊनमधून तब्बल 96 हजार रुपयांचे बी-बियाणांचे पोते चोरट्यानी लंपास केल्याची घटना आज बुधवारी दिनांक 16 जूनला सकाळी चिखलगाव येथे उघडकीस आली. 15 जूनच्या रात्री 12 ते 4 वाजे दरम्यान ही घटना घडल्याचे अंदाज व्यक्त केला जात आहे. कृषी केंद्र चालकाच्या तक्रारीवरून वणी पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्द गुन्हा दाखल करून तपास सुरू केली आहे.
प्राप्त माहितीनुसार चिखलगांव येथे चंद्रशेखर पांडुरंग देठे यांच्या मालकीचे भूमीपुत्र या नावाने कृषीकेंद्र आहे. 15 जूनच्या रात्री दरम्यान अज्ञात चोरटयांनी कृषीकेंद्राच्या गोदामाच्या शटरचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. कृषी केंद्राच्या गोदामामध्ये असलेली 7 क्विंटल तूर किंमत 42 हजार रुपये व सोयाबीन बियाण्याच्या 14 बॅग किंमत 54 हजार 900 रुपये असे एकूण 96 हजार 900 रुपयांचा माल घेऊन चोरटे पसार झाले.
सकाळी कृषी केंद्र उघडण्यास आलेल्या कृषीकेंद्र मालक याना गोडाऊनचे कुलूप तोडून चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यामुळे त्यांनी तत्काळ वणी पोलीस स्टेशनला जाऊन चोरी झाल्याची तक्रार दाखल केली. वणी पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध भादंविच्या कलम 461, 380 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोनि वैभव जाधव यांच्या मार्गदर्शनात जमादार वासुदेव नारनवरे व पोकॉ पुरुषोत्तम डडमल करीत आहे
वणी शहरात चोरीचे सत्र सुरु
वणी शहर व परिसरात मागील काही दिवसापासून चोरीचे सत्र सुरू झाले आहेत. दोन दिवसापूर्वी शहराच्या हृदयस्थळी व पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेले मुख्य पोस्ट ऑफिसमध्ये चोरट्यानी शिरकाव करून चोरीचा प्रयत्न केला. त्याच रात्री रजानगर भागात एका वाईनबार मधून 65 हजार रुपयांची विदेशी दारू चोरी झाली. पोलीस स्टेशनच्या अगदी समोर तहसील परिसरात ठेवलेली दुचाकी भरदिवसा चोरून नेल्याचे दुःसाहस चोरांनी केले. आणि आता कृषी केंद्रातून बी बियाणे चोरून नेल्याची घटना 15 जून रोजी रात्री घडली.
हे देखील वाचा:
[…] चोरट्यांचा चिखलगाव येथील कृषी केंद्र… […]