जितेंद्र कोठारी, वणी: तालुक्यातील शिंदोला माईन्स ते येनक रस्त्यावर शिवणी (जहागीर) येथील एका इसमाचा मृतदेह आढळला. आज दि.13 रोज मंगळवारला सकाळी ही घटना उघडकीस आली. शेषराव गजानन पिंपळशेंडे (50) असे मृतकाचे नाव आहे असून ते खासगी इलेक्ट्रिशियन होते. सदर मृत्यू हा घातपात असल्याची शंका व्यक्त केली जात आहे.
शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या शिवणी (मोठी) येथील शेषराव पिंपळशेंडे हे व्यवसायाने खासगी इलेक्ट्रिशियन होते. तो स्वभावाने मनमिळाऊ होते. शिंदोला परिसरातील गावात ते इलेक्ट्रिशियनचे कामे करून आपला उदरनिर्वाह करायचे. तथापि, त्यांना दारू पिण्याची सवय असल्याची माहिती मिळत आहे.
मंगळवारीला सकाळी शेषरावचा मृतदेह येनक ग्रामस्थांना रस्त्याच्या कडेला आढळून आला. त्यांच्या अंगावरील पॅन्ट काढून होती. तर डोक्यावर दगडाने मारहाण केल्याने रक्तस्राव झाल्याचे दिसून येत होते. घटनेची माहिती शिरपूर पोलिसांना मिळताच घटनास्थळी भेट देऊन घटनेचा पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी वणीच्या ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला.
उत्तरीय तपासणीनंतर शेषरावचा मृत्यू नेमका कशाने झाला ते स्पष्ट होईल. घटनेचा तपास शिरपूर पोलीस करीत आहेत. दरम्यान दुपारी शिवणी येथील लहू आत्राम या तरुणाने विष प्राशन केले. त्याला उपचारासाठी दाखल करण्यात आले.
हे देखील वाचा:
सर आली धावून, माती-मुरुम गेले वाहून… चारगाव ते ढाकोरी (बो) रस्ता 15 दिवसातच जैसे थे