रेतीची अवैधरित्या वाहतूक करणारा ट्रक जप्त

महसूल व डीबी पथकाची कारवाई, 5 ब्रास रेती जप्त

0

जितेंद्र कोठारी, वणी: वणीतील संविधान चौकात रेतीची अवैधरित्या वाहतूक करताना एक हायवा ट्रक महसूल व पोलीस पथकाने पकडला. आज शनिवार 17 जुलै दुपारी ही कारवाई करण्यात आली. सदर कार्यवाहीत हायवा ट्रक व त्यात भरलेली 5 ब्रास रेती जप्त करण्यात आली आहे.

प्राप्त माहितीनुसार शहर पोलीस डीबी पथक पेट्रोलिंग करीत असताना वरोरा मार्गावरून येत असलेल्या हायवा ट्रकला थांबविले. दरम्यान तहसीलदार शाम धनमने गस्तीवर असताना तिथे पोहचले. ट्रकमध्ये भरलेल्या रेतीबाबत ट्रक चालकाला विचारणा केली असता त्यांनी वणी येथे नेत असल्याचे सांगितले.

तहसीलदार यांनी ट्रक चालकाकडून रॉयल्टी घेऊन तपासणी केली असता रॉयल्टीची मुदत संपली असल्याचे दिसून आले. तसेच रॉयल्टीवर खरेदीदाराचे नाव व पत्ता लिहून नसल्याची बाबही लक्षात आली. त्यावरून सदर हायवा ट्रक (MH34 AB7779) व त्यात भरलेली 5 ब्रास रेती जप्त करुन ट्रक पोलीस स्टेशन आवारात उभा करण्यात आलाये.

मिळालेल्या माहितीनुसार सदर हायवा भद्रावती येथील आशिष रायच्या नावावर आहे. तसेच वणी येथील एका रेती व्यावसायिकाच्या मागणीवरून रेती वाहतूक केली जात होती. सदर कार्यवाही तहसीलदार शाम धनमने, नायब तहसीलदार रामचंद्र खिरेकर, डीबी पथक प्रमुख पोऊनी गोपाल जाधव व पथकाने केली. बातमी लिहेपर्यंत महसूल विभागाकडून दंडात्मक कारवाई सुरु होती.

हे देखील वाचा:

महाविद्यालयात शिकणा-या तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

लहानग्या मुलाला उचलून जमिनीवर आदळले

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.