स्वातंत्र्याच्या सात दशकानंतरही त्यांच्या नशिबी नावेतूनच प्रवास
तेजापूर नदी घाटावर पूल नसल्याने प्रवाशांना उलटफेरा
जितेंद्र कोठारी, वणी: यवतमाळ-चंद्रपूर जिल्ह्याला जोडणाऱ्या पैनगंगा नदीवरील तेजापूर-गांधीनगर नदी घाटावर पूल नसल्याने या परिसरातील नागरिकांना नावेतूनच जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो आहे. मात्र पुलाच्या निर्मितीकडे लोकप्रतिनिधी व प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. याबाबत नदीच्या दोन्ही बाजूला असलेल्या लोकांद्वारे सातत्याने निवेदन दिली जातात. मात्र निवेदनाला केराची टोपली दाखवली जाते. या कामात ना लोकप्रतिनिधींनी उत्साह दाखवला आहे ना प्रशासन याला गांभीर्याने घेत. त्यामुळे नदीच्या दोन्ही तिरावरील गावातील नागरिकांच्या नशिबी अद्यापही नावेतूनच प्रवास करावा लागतो आहे.
नदी घाटावर पुल नसल्याने तालुक्यातील तेजापूर व नदी पल्याड चंद्रपूर जिल्ह्यात असलेल्या गांधीनगर (कोडशी) भागातील नागरिकांना 30 ते 35 किलोमीटरचे अंतर कापून मोहदा-वेळाबाई मार्गे उलटफेरा मारत प्रवास करावा लागत आहे. यात वेळ तर जात आहे शिवाय अधिकचा आर्थिक बोजाही सर्वसामान्यांच्या डोक्यावर पडत आहे. जनतेला सहन करावी लागते आहे.
या नदी घाटावर बॅरेज बंधारा कम पुलाची निर्मिती करण्यात यावी अशी मागणी गेल्या चाळीस वर्षांपासून सुरू आहे. मात्र त्यावर केवळ आश्वासने दिली जाते आहे. त्यामुळे नागरिकांत ही असंतोष व्यक्त होत आहे. त्यामुळे आता तरी या नदी घाटावर पुलाच्या निर्मितीचे कार्य हाथी घेण्यात यावे अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. हा पूल झाल्यास गणेशपुर ते कोरपना पर्यंतच्या गावातील ग्रामस्थांचा प्रवास सुलभ होईल.
गावक-यांनी लोकसहभागातून तयार केला होता पूल
या मार्गाला पर्यायी रस्ता असलेल्या तेजापूर्-देऊरवाडा मार्गावरील नाल्यावर नागरिकांनी लोकवर्गणीतून तीन वर्षांआधी पूल बांधला होता. या कामासाठी डॉ. महेंद्र लोढा यांनी पुढाकार घेतला होता. नागरिकांनी आठवड्याच्या आत पूल बांधून पूर्ण केला होता. स्थानिकांच्या या कामाची तेव्हा राज्यभरात चर्चा झाली होती. मात्र अवघ्या दोन महिन्यात नदीला भीषण पूर आला आणि या पुलात संपूर्ण पूल वाहून गेला व पुराने नागरिकांचा पर्यायी मार्गही वाहून नेला.
हे देखील वाचा: