मारेगाव येथे शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड आणि जिजाऊ ब्रिगेडचा उपक्रम

तालुका प्रतिनिधी, मारेगाव: छ. शिवाजी महाराज जन्मोत्सवा निमित्त मारेगावात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात व्याख्यान, विविध स्पर्धा इत्यादी कार्यक्रमांची रेलचेल राहणार आहे. मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड तथा जिजाऊ ब्रिगेड यांच्या संयुक्त विद्यमाने या जन्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

दि. १९ फेब्रुवारीला जन्मोत्सव सोहळा संपन्न होत आहेत. सकाळी ६ वाजता शिवस्तवनाने सुरुवात होणार आहे. या कार्यक्रमानंतर ७ वाजता अर्ध मॅरेथॉन स्पर्धा होणर आहेत. पुरुषांसाठी ४ किमी तर महिलांसाठी २ किमी अंतर राहणार आहेत. पुरुषवर्गासाठी ३ हजार रुपये, २ हजार रुपये आणि १ हजार रुपये असून महिलावर्गासाठी २ हजार, १.५ हजार आणि १ हजार रुपये बक्षिस आहे.

सकाळी १० वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तैलचित्रास अभिवादन केले जाईल. १०.३० वाजता वर्ग १ ली ते ९ वीच्या विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा ठेवण्यात आली आहे. स्पर्धेचा विषय महापुरुषांचे चित्र किंवा निसर्ग चित्र असून बक्षीस १ हजार, सातशे, व पाचशे रुपये आहे. या स्पर्धेनंतर ११.३० वाजता स्लो सायकल स्पर्धा असून येथेही १ हजार, सातशे व पाचशे रुपये बक्षीस ठेवण्यात आले आहे.

दुपारी दोन वाजता रांगोळी स्पर्धा ठेवण्यात आलेली असून येथेही १ हजार, सातशे व पाचशे रुपये बक्षिसे ठेवण्यात आली आहे. शिवजन्मोत्सवानिमित्त होणाऱ्या या सर्व स्पर्धा तसेच कार्यक्रमामध्ये स्पर्धक तसेच नागरिकांनी मोठया संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.

हे देखील वाचा:

पुष्पाच्या धुवाधार यशानंतर सुपरस्टार रवी तेजाचा खिलाडी झालाये रिलिज

जैन स्थानक समोरील दुकानाला भीषण आग, दुकान जळून खाक

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.