भास्कर राऊत, मारेगाव: रात्री रुंझाहून तालुक्यातील चिंचमंडळ येथे नातेवाईकांकडे दुचाकीने जात असताना दुचाकीने रस्त्यावर पडलेल्या झाडाला धडक दिली. या अपघातात गाडीवर बसलेल्या 3 वर्षीय बालिकेचा मृत्यू झाला. चिंचमंडळ जवळ ही घटना घडली.
13 एप्रिलला मार्डी परिसराला मोठया प्रमाणावर वादळाचा तडाखा बसला. यामुळे मार्डी ते वडकी रस्त्यावर झाडे सुद्धा पडली होती. गुरूवारी दिनांक 14 एप्रिल रोजी पांढरकवडा तालुक्यातील रुंझा येथील रहिवासी शाम पारशिवें हे त्यांची मुलगी कु. गुंजन वय 3 वर्षे व पत्नी यांच्यासोबत दुचाकीवर बसून रुंझा येथून चिंचमंडळ येथे येत होते. रात्री नऊ वाजताच्या सुमारास समोरून येणाऱ्या चारचाकी वाहनाच्या लाईटने दुचाकीस्वार शाम यांचे डोळे दिपले.
डोळे दिपल्याने त्यांना रस्त्यावरील झाड दिसून आले नाही. व त्याची दुचाकी रस्त्यावरील झाडावर जाऊन आदळली. यात तिन वर्षीय बालिका गुंजन ही दुचाकीवरून खाली पडली. अपघातात तिच्या डोक्याला गंभीर ईजा झाली. जखमा अवस्थेत तिला वणी ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले.
मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केले. एका कार्यक्रमासाठी आपल्या कुटुंबाला घेऊन जाणाऱ्या बालिकेवरच काळाने घाला घातल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
हे देखील वाचा:
हृदयद्रावक: 8 व्या माळ्यावरील गॅलरीतून कोसळून वृद्धाचा मृत्यू
Comments are closed.