दारू पिल्यानंतर ‘तू मेरा भाई है’ डॉयलॉग मारल्याने मारहाण

'सलमान'ची रेजर ब्लेड घेऊन फिल्मी स्टाईल एन्ट्री... डोक्यात दगड घातल्याने एक जखमी

बहुगुणी डेस्क, वणी: दारु पिले की अनेकांना फिल्मी डायलॉग सुचतात. कुणी ‘आज गाडी तेरा भाई चलाएगा’ म्हणतो. तर कुणी ‘तू मेरा भाई है’ म्हणतो. दारु पिल्यानंतर झालेल्या अशाच वायफळ डायलॉगबाजीतून वाद झाला. वादातून दोन भावांनी  एकाला जबर मारहाण करत त्याच्या डोक्यात दगड घातला. यात सदर तरुण जखमी झाला. रविवारी वणीतील खडबडा मोहल्ला येथे ही घटना घडली. या प्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जावेद खान हमिद खान (30) हा खडबडा मोहल्ला येथील रहिवासी आहे. तो मजुरीचे काम करतो व त्याच्या कुटुंबीयांसह राहतो. त्याच परिसरात समीर (20) व सलमान (19) नावाचे दोन तरुण राहतात. या दोघांना दारु पिण्याची सवय आहे. दारूच्या नशेत ते येणा-या जाणा-या लोकांना शिविगाळ करतात. असा तक्रारदाराचा आरोप आहे.

रविवारी दिनांक 14 जानेवारी रोजी संध्याकाळी 7 वाजताच्या सुमारास सलमान हा दारुच्या नशेत जावेद जवळ आला त्याने ‘तु मेरा भाई है’ हा दारू पिल्यावरचा सुप्रसिद्ध डॉयलॉग त्याने मारला. त्यावर जावेदने त्याला तू दारू पिऊन आहे. असे समजावून घरी पाठवले. मात्र त्यानंतर रात्री 9 वाजताच्या सुमारास तो पुन्हा जावेदच्या घरी आला. मात्र आता तो रेजर ब्लेडचा पत्ता घेऊन आला.

सलमानने जावेदला शिविगाळ करीत लाथा बुक्यांनी मारहाण केली. दरम्यान सलमानचा भाऊ समीर देखील तिथे पोहोचला. सलमानने जावेदला पकडले तर समीरने जावेदला जमिनीवरील दगड उचलून जावेदच्या डोक्यात घातला. त्यामुळे जावेदचे डोके फुटले.

झालेल्या मारहाणी मुळे जावेदने वणी पोलीस ठाणे गाठत याबाबत तक्रार दिली. पोलिसांनी आरोपी समीर व सलमान विरोधात भादंविच्या कलम 324, 34, 504 नुसार गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाचा तपास वणी पोलीस करीत आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

हे देखील वाचा:

वणीतील तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

कोंबड बाजारावर धाड, 7 जुगारी अटकेत

Comments are closed.