प्रभाग 13 ते 14 – वणी नगरपालिका निवडणूक निकाल, काँग्रेसचा दणदणीत विजय
5 पैकी महाविकास आघाडी 3 तर भाजपला 2 जागा... पाहा संपूर्ण निकाल... फक्त वणी बहुगुणीवर...
बहुगुणी डेस्क, वणी: पाचव्या फेरीत प्रभाग 13 ते 14 (अ व ब) या प्रभागाची मतमोजणी झाली. यात काँग्रेसने आपले या निवडणुकीतले सर्वोत्कृष्ट प्रदर्शन केले. काँग्रेसने प्रभाग क्रमांक 13 मधल्या दोन्ही जागांवर दणदणीत विजय मिळवला. तर प्रभाग 14 मध्ये भाजपने एका जागी अत्यंत चुरशीच्या लढतीत अवघ्या 3 विजय मिळवला तर एका जागेवर शिवसेना उबाठाचा उमेदवार निवडून आला. सहाव्या फेरीत प्रभाग क्रमांक 14 (क) ची मतमोजणी झाली. यात सर्वाधिक मते घेत भाजपने विजय मिळवला.
पाचव्या फेरी अखेर भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार विद्या खेमराज आत्राम यांनी 4792 मतांनी महाविकास आघाडी व शिवसेना उबाठाच्या उमेदवार डॉ. संचिता विजय नगराळे यांचा दणदणीत पराभव केला. सर्व फेरी अखेर भाजप हा 29 पैकी 18 जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तर महाविकास आघाडीला 9 जागा मिळाल्या आहेत. यात शिवसेना उबाठाला 6 तर काँग्रेसला 3 जागांवर समाधान मानावे लागले. तर अपक्षांनी दोन जागेवर विजय मिळवला आहे. जाणून घ्या कुणाला मिळाले किती मतं?
प्रभाग क्रमांक 13 अ
किरण मुरलीधर कुत्तरमारे – शिवसेना – 370
ललिता मारोती भेदोडकर – भाजप – 1015
अलका मारोती मोवाडे – काँग्रेस – 1193 (नोटा 47)
प्रभाग क्रमांक 13 ब
धर्मेंद्र नामदेव काकडे – शिवसेना – 322
राजेश्वर सुरेश चापडे – भाजप – 885
प्रवीण अशोक डाहुले – अपक्ष – 13
निखिल धर्मा ढुरके – अपक्ष – 50
दादाजी लटारी पोटे – आम आदमी पार्टी – 32
पुरण कुंदणगीर पवार – प्रहार जनशक्ती पार्टी – 30
रहेमान सैफूर मोबिन – काँग्रेस – 1247 (नोटा 46)
________________________________________
प्रभाग क्रमांक 14 अ
मनिषा राजू गव्हाणे – भाजप – 1310
निलीमा सचिन गेडाम – अपक्ष – 118
आशाताई पांडुरंग टोंगे – काँग्रेस – 423
ज्योत्स्ना अरविंद पुसनाके – अपक्ष – 199
तुळसा प्रवीण पेंदोर – शिवसेना – 262
माधुरी महेश साळुंके – शिवसेना (उ. बा. ठा.) – 1307 (नोटा 53)
प्रभाग क्रमांक 14 ब
संतोष पुंडलिक पारखी – शिवसेना – 467
दिपक मारोती मोरे – अपक्ष – 812
रंगरेज गुलाम रसूल वली – शिवसेना (उ. बा. ठा.) – 1513
सुभाष बाबुलाल वाघडकर – भाजप – 808 (नोटा 72)
प्रभाग क्रमांक 14 क
हिना अहेमद शकील – शिवसेना – 874
अर्चना शंकरराव झिलपे – भाजप – 1479
माया मारोती ढुरके – राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) – 157 (नोटा 83)
________________________________________
भाजपचा डंका… दणदणीत विजय… विद्या खेमराज आत्राम वणीच्या नवीन नगराध्यक्ष
अवघ्या 6 मताने विजय ! प्रभाग क्रमांक 4 ते 6 – वणी नगरपालिका निवडणूक निकाल
‘टापू’ने सर केला गड ! प्रभाग क्रमांक 7 ते 9 – वणी नगरपालिका निवडणूक निकाल
भाजपचे सर्व उमेदवार विजयी…. प्रभाग क्रमांक 10 ते 12 – वणी नगरपालिका निवडणूक निकाल



Comments are closed.