कुंभा येथे विजेचा धक्याने सासू व सुनेचा मृत्यू
जितेंद्र कोठारी, वणी: मारेगाव तालुक्यातील कुंभा येथे सकाळी सात वाजताच्या सुमारास कपडे वाळू घालत असताना विजेच्या धक्याने सुनीता शंकर मोहुर्ले (30) व शकुंतला वामन मोहुर्ले (50) या सासू सुनेचा मृत्यु झाला. ही दुर्दैवी घटना शुक्रवारी घडली.
कुंभा येथील बेघर वस्तीमध्ये मोहुर्ले परिवार राहत असून या घराच्या भिंतीला जि.आय.तार लागलेली आहे. त्याच ठिकाणी जिवंत करंट असलेल्या फ्लेग्जिबल वायरचा इन्सुलेट कट झाल्यामुळे ताराला करंट आला. त्या ठिकाणी कपडे सुकविण्यासाठी गेलेल्या सुनेला प्रथम करंट लागला. लगेच ती खाली कोसळली. ही घटना सासूला कळताच सासू सुनेला वाचविण्यासाठी धाऊन गेली असता सासू आणि सून दोघीही जोरदार शॉक लागून कोसळल्या. ही घटना शेजाऱ्यांना कळताच त्यांना उपचारासाठी वणी येथील खाजगी दवाखान्यात दाखल केले.डाॅक्टरांनी त्या दोघीं सासु सुनेला मृत्यु झाल्याचे घोषित केले.
मृतक सुनिता मोहुर्ले ही गरोदर असल्याची माहिती असून त्याला चार वर्षांचा मुलगा आहे. सुनिताचा पती कुंभा येथे टेलरिंगचा व्यवसाय करतो. या घटनेने कुंभा गाव व परिसरात शोककळा पसरली. मारेगाव वीज वितरण कंपनीचे अधिकारी व मारेगाव पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. कुंभा बिटचे जमादार मांडवकर घटनेचा तपास करीत आहे.