मारेगाव येथे कार व ट्रकची समोरासमोर भीषण धडक, कार चकनाचूर…

भास्कर राऊत, मारेगाव: शहरालगत मारेगाव-वणी रोडवर कार व ट्रकची समोरासमोर भीषण धडक झाली. शनिवारी संध्याकाळी 5.30 वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातात कार चालक गंभीर जखमी झाला. शुभम गोलर (28) रा. वणी असे जखमी कारचालकाचे नाव आहे. हा अपघात एवढा भीषण होता की यात कारचा समोरचा भाग चकनाचूर झाला. त्यामुळे जखमी कारचालकाला लोकांनी कारचा दरवाजा तोडून व काच फोडून बाहेर काढले.

Podar School 2025

वणीतील शुभम गोलर हा वणीतील तरुण त्याच्या अल्टो कारने मारेगाव येथे कामानिमित्त आला होता. संध्याकाळी 5.30 वाजताच्या सुमारास तो मारेगावहून वणी येथे परत जात होता. दरम्यान मारेगाव शहरापासून एक ते दीड ते किलोमीटर अंतरावर असलेल्या तुळशीराम बार समोर कारचालक शुभमच्या भरधाव कार एका ट्रकला समोरासमोर धडकली. या अपघातात कारचालक गंभीर जखमी झाला.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

हा अपघात इतका भीषण होता की यात कारची समोरील भाग संपूर्ण चकनाचूर झाला व यात कारचालक फसला होता. हे भीषण दृष्य बघून रस्त्यावरील लोक व गावातील काही नागरिक घटनस्थळी पोहोचले व त्यांनी कारचालकाला कारबाहेर काढण्याचा प्रयत्न केला. अखेर सब्बल आणि इतर काही अवजारे आणण्यात आले. अर्ध्या तासाच्या परिश्रमानंतर कारच्या काचा फोडून व दरवाजा तोडून जखमी कारचालकाला बाहेर काढण्यात लोकांना यश आले.

जखमीस मारेगाव ग्रामीण रूग्णालयात येथे उपचारासाठी नेण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने प्रथमोपचार करून चालकाला पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे हलवण्यात आले. दरम्यान अपघात होताच ट्रकचालक घटनास्थळावरून पसार झाला. प्रकरणाचा तपास मारेगाव पोलीस करीत आहे.

हे देखील वाचा: 

अपहरण व खंडणी प्रकरणातील 4 आरोपी जेरबंद

Comments are closed.