आता पासपोर्ट मिळणार फक्त तीन दिवसात

नागरिकांच्या सुविधेसाठी मोबाईल ऍप तयार

0

नवी दिल्ली: पासपोर्ट काढण्याची प्रक्रिया अधिक सोपी व्हावी, त्यासाठी लागणारा विलंब टाळता यावा यासाठी नवीन मोबाईल अॅप तयार करण्यात आला आहे. या अॅपद्वारे पोलीस पडताळणी करता येणार आहे. त्यामुळे आता पासपोर्ट अवघ्या तीन दिवसातच मिळणार आहे. पासपोर्ट काढण्याची प्रक्रिया अधिक सोपी व्हावी यासाठी प्रयत्न केले जात आहे. त्यात आता पोलिसांनी सुरू केलेल्या या मोबाईल अॅपमुळे पोलीस पडताळणीच्या प्रक्रियेसाठी लागणा-या वेळेत बचत होणार आहे.

पासपोर्टची सर्व प्रक्रिया ऑनलाईन झाल्यामुळे पासपोर्ट कार्यालये आणि पोलीस ठाण्याच्या फे-या कमी झाल्या आहेत. आता पोलीस पडताळणीही ऑनलाईन झाल्यामुळे पासपोर्ट काढण्यासाठीची प्रक्रिया अधिक सुकर आणि वेगाने पूर्ण होणार आहे.

पासपोर्टसाठी अर्ज केल्यानंतर पोलीस पडताळणीसाठी या मोबाईल अॅपचा आधार घेतला जाणार आहे. या अॅपवरूनच तुमची संपूर्ण माहिती घेण्यात येईल. त्यानंतर तुमच्या अर्जानुसार पडताळणीसाठी पोलीस तुमच्या घरी येतील. त्यानंतर आपल्यावर गुन्हेगारी खटले नसल्याचे प्रतिज्ञापत्र द्यावे लागेल. तसेच आधार कार्ड, मतदार ओळखपत्र आणि पॅनकार्डच्या प्रतीसह अर्ज सादर केल्यानंतर पासपोर्ट कार्यालयाकडून प्राधान्याने तुमचा पासपोर्ट जारी करण्यात येईल.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.