मुंबई: मुकेश अंबनी यांनी जगातील सर्वात स्वस्त फोन असा उल्लेख केलेल्या रिलायन्स जिओ मोबाईलची सगळेच आतुरतेने वाट पाहत आहेत. ग्राहकांना फुकटात हा फोन मिळणार आहे, फक्त 1500 रुपये डिपॉझिट त्यासाठी भरावं लागणार आहे. मात्र जिओ फोनची वाट पाहणाऱ्यांची काहीशी निराशा होणार आहे. कारण या फोनमध्ये व्हॉट्सअप चालणार नाही, अशी माहिती समोर आली आहे.
भारतात व्हॉट्सअप प्रचंड लोकप्रिय आहे. त्यामुळे व्हॉट्सअप चालणार नसेल तर हा फोन घेताना लोक नक्कीच विचार करतील. रिलायन्सच्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत मुकेश अंबानी यांनी या फोनची घोषणा केली. 24 ऑगस्टपासून या फोनची प्री बुकिंग सुरू होणार आहे.
(रिलायंस जिओचा धमाका, 4G फिचर फोन लॉन्च)
जिओ फोन देशातील मुख्य 22 भाषांना सपोर्ट करेल. त्यासोबतच हा फोन तुमच्या आवाजाने ऑपरेट केला जाईल. जिओच्या या फिचर फोनमधून व्हॉइस कमांड द्वारे तुम्ही मेसेज पाठवून शकता आणि कॉल करू शकता. हा फोन फुकट असून फोनसाठी केवळ 1500 रूपये अनामत रक्कम असणार आहे.