दोघे मित्र गेलेत रेस्टॉरंटमध्ये आणि चोरट्याने साधला डाव

चंद्रपूरच्या युवकाची दुचाकी वणी येथून चोरी

0

जितेंद्र कोठारी, वणी: वणी येथील मित्राला भेटण्यासाठी आलेल्या युवकाला मित्रांसोबत बारमध्ये जाणे चांगलेच महागात पडले. बारमध्ये बसून जेवण करीत असताना अज्ञात चोरट्यांनी बारच्या बाहेर पार्किंग केलेली त्याची मोटारसायकल लंपास केली. याबाबत दुर्गापूर जि. चंद्रपूर येथील परवेज शरीफ शेख यांनी 16 डिसेंबर रोजी वणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

Podar School 2025

सविस्तर वृत्त असे, की तक्रारदार दुर्गापूर जि. चंद्रपूर येथील परवेज शरीफ शेख हा 12 नोव्हेंबर रोजी वणी येथे आपल्या मित्राला भेटण्यासाठी दुचाकीने आला होता. मित्राची भेट घेऊन परवेज व त्याचा मित्र जेवण करण्यासाठी यवतमाळ रोडवरील नंदिनी बार अँड रेस्टॉरंटमध्ये गेले. बारच्या बाहेर रस्त्यावर त्यांनी आपली निळ्या रंगाची स्प्नेंडर क्र.(एम.एच.34 ए.टी.6704) पार्किंग करून दोघे बारमध्ये गेले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

दुपारी 3.00 वाजता दरम्यान दोघे जेवण करून बाहेर आले असता मोटारसायकल दिसून आली नाही. इकडे तिकडे शोधूनही दुचाकी मिळून आली नाही. त्यामुळे अखेर परवेज यांनी 16 डिसेंबर रोजी वणी पोलीस ठाण्यात मोटारसायकल चोरीची तक्रार दिली. पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्द कलम 379 नुसार गुन्हा दाखल करून एएसआय डोमाजी भादिकार पुढील तपास करीत आहेत.

हेदेखील वाचा

हेदेखील वाचा

Leave A Reply

Your email address will not be published.