‘बा भीमा’ कार्यक्रमातून सिंफनी स्टुडिओची डॉ. बाबासाहेबांना स्वरांजली

कलोतीनगर अमरावतीच्या सिंफनी स्टुडिओ आणि वाणे परिवाराचे आयोजन

0

बहुगुणी डेस्क, अमरावती: विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सर्वत्र साजरी झाली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सिंफनी स्टुडिओ आणि सिंफनी गृप ऑफ म्युझिक कल्चरल अॅण्ड वेलफअर ट्रस्टने अत्यंत साधेपणाने साजरी केली. त्या निमित्त बा भीमा या भीमगीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन केले.

दस्तुरनगर जवळील कलोतीनगर स्थित सिंफनी स्टुडिओत यांचे रेकॉर्डिंग झाले. सिंफनी ट्यून्स या युट्यूब चॅनलवरती आणि फेसबूक लाईव्हवरती हा कार्यक्रम प्रसारित झाला.

‘बा भीमा’ या मैफलीत जयंत वाणे , गोपाल सालोडकर, कामिनी खैरे, गुरूमूर्ती चावली, शीतल भट आणि प्रा. पंकज गजभिये यांनी गायन केलं. शीतल भट यांनी गायलेल्या भोर भये या गीताने मैफलीचा आरंभ झाला. बा भीमा माहा हे शीर्षक गीत जयंत वाणे यांनी सादर केलं. माझ्या भीमाच्या नावाचं कुंकू हे गीत कामिनी खैरे यांनी सादर केलं.

 

अंगुलीमाल चित्रपटातील तब मानव तू मुख से बोल हे गीत गुरुमूर्ती चावली यांनी गायलं. वामनदादा कर्डक यांचं उद्धरली कोटी कुळे हे गीत जयंत वाणे यांनी आपल्या शैलीत पेश केलं. छोटे बाबू कव्वाल यांची वो बात करो पैदा ही कव्वाली गोपाल सालोडकरांनी गाऊन मैफलीत रंग भरला. धनी माझा मौल्यवान हे गीत शीतल भट यांनी गायलं.

ना भाला ना बर्ची या जयंत वाणे यांनी गायलेल्या गीताने मैफलीत जोश आला. कामिनी खैरे यांनी भीमराज की बेटी हे गीत सादर केलं. चंदनाची छाया या गोपाल सालोडकरांनी गायलेल्या गीताने कार्यक्रमाची सांगता झाली,

आशयगर्भ आणि अभ्यासपूर्ण निवेदन अॅड. वैशाली वाणे यांनी केलं. संगीत संयोजन सुनीत बोरकर, कीबोर्डची साथ सचिन गुडे, तालवाद्यांची साथ विशाल पांडे यांनी केली. तंत्रदिग्दर्शनासह चित्रिकरण अमीन गुडे यांनी केलं. तंत्रसहाय्य भूषण बारबुद्धे यांनी केलं. कार्यक्रमाची संपूर्ण संकल्पना जयंत वाणे आणि अॅड. वैशाली वाणे यांची होती.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून कार्यक्रम सुरू झाला. आयोजन प्रमुख जयंत वाणे, अॅड. वैशाली वाणे आणि सिंफनी गृपचे अध्यक्ष सचिन गुडे होते.

खालील लिंकवर कार्यक्रम कधीही पाहता येईल

https://www.youtube.com/watch?v=V5wWaMDQGPY

 

हेदेखील वाचा

बंद बारमधून दारू काढून तस्करी, एकाला अटक दोघे फरार

हैदेखील वाचा

लॉकडाऊनमध्ये मयूर मार्केटिंगतर्फे ऑनलाईन सेवा सुरू

 

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.