डॉ. तुषार देशमुख वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षपदी

युवा आणि विद्यार्थीनेतेम्हणून त्यांच्या गौरवास्पद कार्याची घेतली दखल

0

सुनील इंदुवामन ठाकरे, अमरावती: युवा सामाजिक कार्यकर्ते व विद्यार्थी चळवळीतीत अग्रेसर असणारे युवानेते डॉ. तुषार देशमुख यांची वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेच्या राष्ट्रीय कार्यकारणीमध्ये कार्याध्यक्षपदी निवड झाली. तसेच पूर्वविभाग प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली. ही नियुक्ती राष्ट्रीय अध्यक्ष इंजी. शिवाजीराजे पाटील यांनी केली.

डॉ तुषार देशमुख हे विद्यार्थीदशेपासून मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेडच्या चळवळीत सक्रिय आहेत. याआधी जिल्हाध्यक्ष, विदर्भ अध्यक्ष, प्रदेश उपाध्यक्ष ,राष्ट्रीय उपाध्यक्ष व आता राष्ट्रीय कार्याध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

त्यांच्या नेतृत्वात अनेक आंदोलने झालीत. त्यातून विद्यार्थी युवक व शेतकरी यांना न्याय मिळाला आहे. त्यांनी महाराष्ट्र सरकारकडे सतत परीक्षा न घेण्यासंदर्भात पाठपुरावा केला होता. त्यात त्यांना यश मिळालेआहे. अमरावती विद्यापीठावर त्यांच्या नेतृत्वात अनेक आंदोलने झालीत. विद्यापीठाच्या छात्रसंघ निवडणुका त्यांच्या मार्गदर्शनात लढवल्या गेल्या आहेत. संपूर्ण देशात अभिनव अशा घरगुती शिवजयंती सजावट स्पर्धेचे ते संस्थापक आहेत. त्याचप्रमाणे सह्याद्री माझा व अटलास टाइम्स न्यूजचे ते मुख्य संपादक आहेत.

त्यांच्या निवडीने संपूर्ण विदर्भातील विद्यार्थी व युवावर्गात चैतन्य निर्माण झाले. त्यांच्यावर विविध माध्यमातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांनी आपल्या निवडीचे श्रेय राष्ट्रीय अध्यक्ष इंजि. शिवाजीराजे पाटील, माजी अध्यक्ष डॉ. सुदर्शन तारक, प्रा. प्रेमकुमार बोके यांना दिले. मराठा सेवा संघाचे महासचिव मधुकरराव मेहकरे, अरविंद गावंडे, अश्विन चौधरी, जिजाऊ ब्रिगेडच्या मयुरा देशमुख, मनाली तायडे, सीमा बोके,संगीतसूर्य भोसले परिषदेच्या वर्षाताई धाबे, जिजाऊ बँकेचे अध्यक्ष अविनाश कोठाळे, संभाजी ब्रिगेडचे रणजित तिडके, शरद काळे, शुभम शेरेकर, अजित काळबांडे, प्रतीक काटोलकर, क्षात्रवीर प्रतिष्ठानचे अजय इंगळे, परेश मोहोड, निखिल काटोलकर, विक्रांत बोंडे, रिध्येश ठाकरे, गौरव भोकसे, सुमित रिठे, प्रणव अडगोकार, संतोष किटुकले, सत्यजित देशमुख, अभिजित देशमुख, वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेचे अक्षय खडसे, शुभम राणे, अक्षय भांबुरकर, ऋत्विक हिवसे आदींनी अभिनंदन केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.