सुशील ओझा, झरी: सध्या जिल्ह्यात व कोरोना रूग्नांची संख्या वाढत आहे. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ब्रेक द चेन अंतर्गत कठोर निर्णय घेतला आहे. त्याच अनुषंगाने बाजार पेठेतील अत्यावश्यक दुकाने सोडून इतर दुकाने बंद ठेवण्याचे सक्त आदेश आहे. परंतु सदर आदेशाचे पालन होत नसल्याचे चित्र तालुक्यात वहायला मिळत आहे.
मुकुटबन येथे कोविड 19 चे विषाणू व्यवस्तपन हेतूने तलाठी आर. एफ.राणे कोतवाल कांबळे व ग्रामपंचायत कर्मचारी हे मार्केट मध्ये फिरत असतांना मुकुटबंन येथील बस स्थानक जवळील दत्तकृपा पान सेंटर चालक राकेश विनोद निब्रड वय 30 वर्ष यांची पानटपरी अर्ध शटर उघडे करून सुरू होते.
तलाठी राणे यांनी पानटपरी बंद करण्यास सांगितले असता राकेश निब्रड याने उडवाउडवीची उत्तरे दिली यावरून तलाठी आर. एफ राणे यांनी पोलिस स्टेशन ला तक्रार दिली. यावरून पोलिसांनी महामारी रोग अधिनियम व ताळेबंधीचे उलन्घन केल्या प्रकरणी कलम 188 अंतर्गत राकेश विनोद निब्रड याच्यावर गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलीस करीत आहे.
हे देखील वाचा: