प्रतिबंधित तंबाकूची विक्री करणाऱ्यावर कारवाई:

एकूण 4 लाख 39 हजाराचा मुद्देमाल जप्त

0

जब्बार चीनी, वणी: दीपक चौपाटी परिसरातील भाग्यशाली नगर येथे असलेल्या किराणा दुकानातून प्रतिबंधित तंबाकू व सुपारी विक्री करणाऱ्यावर 14 एप्रिल रोजी सायंकाळी 8 वाजताच्या सुमारास कारवाई करण्यात आली.

Podar School 2025

सदर कारवाईत 1 लाख 89 हजार 60 रुपयांचा प्रतिबंधित तंबाकू, सुपारी व गुन्ह्यात वापरण्यात अलेले वाहन असा एकूण 4 लाख 39 हजार रुपयांचा मुद्देमाल जपत करण्यात आला. किराणा दुकान चालक आरोपीवर विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

सविस्तर वृत्त असे की, 14 एप्रिल सायंकाळी 8 वाजताच्या सुमारास वणीतील दीपक टॉकीज परिसरातील राजेश मार्गमवार यांच्या दुकानात प्रतिबंधित तंबाकू येणार असल्याची माहिती वणी पोलिसांना मिळाली.

पोलिसांनी यावेळी सापळा रचला व 8 वाजता सदर दुकानात उतरत असलेल्या मालाची पाहणी केली. या सांट्रो वाहनात मधल्या सीटवर एका प्लास्टिकच्या बोऱ्यात 100 डब्बे मजा तंबाकू 200 ग्राम वजनाचे, ईगल हुक्का तंबाकू 400 ग्राम वजनाचे 90 पॉकेट,

बाबू गोल्ड टोबॅको 500 ग्राम वजनाचे 72 नग, ईगल हुक्का शिशा तंबाकू 200 ग्राम वजनाचे 68 पॉकेट व चारमिनार गोल्ड सुपारी 100 पॉकेट आढळून आले. ज्याची किंमत 1 लाख 89 हजार 60 रुपये आहे.

सदर मालाबाबत विचारणा केली असता आरोपी राजू पांडुरंग मार्गमवार यांनी सांगितले हा माल पाटनबोरी येथील राजू येटलावार यांच्याकडून घेतला असल्याची माहिती दिली.

सदर गुन्ह्यात आरोपी राजू मार्गमवार व मुख्य आरोपी यांच्याविरुद्ध कलम 188, 269, 270, 271, 272, 273 भादवी सहकलम 2,3 नुसार गुन्हा दाखल केला आहे. या तपासता पुन्हा आरोपी वाढण्याची शक्यता आहे. तसेच घटनेचा तपास सुरू आहे.

ही कारवाई डॉ दिलीप पाटील भुजबळ पोलीस अधीक्षक, खंडेराव धरणे अप्पर पोलीस अधीक्षक, संजय पुजलवार उपविभागीय पोलीस अधिकारी, वैभव जाधव ठाणेदार वणी यांच्या मार्गदर्शनाखाली पोऊनी माया चाटसे, डोमजी भादिकर, सुधीर पांडे, सुनील खंडागळे, रत्नपाल मोहाडे, पंकज उंबरकर, सुदर्शन वनोळे, दीपक वांड्रसवार, यांनी केली.

हेदेखील वाचा

हेदेखील वाचा

Leave A Reply

Your email address will not be published.